---Advertisement---

आयपीएलच्या सुरुवातीलाच गंटागळ्या खाणाऱ्या सीएसकेबद्दल ऑसी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी; म्हणाला…

Chennai-Super-Kings
---Advertisement---

आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जसाठी निराशाजनक राहिली. सीएसकेने या हंगामातील पहिला सामना केकेआरविरुद्ध खेळला आणि त्यामध्ये पराभव पत्करला. पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज मॅथ्यू हेडनने सीएसकेविषयी आश्चर्यकारक भविष्यवाणी केली आहे.

मागच्या आयपीएल सामन्यात सीएसके आणि केकेआर (CSK vs KKR) हे दोन संघ अंतिम सामन्यात आमने-सामने होते. याच कारणास्तव आयपीएल २०२२ (IPL 2022) चा पहिला सामना या दोन संघांमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये केकेआरने सीएसकेला धूळ चारली. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन दिग्गज मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

हेडन म्हणाले की, “सीएसके (Chennai Super Kings) त्याच्या सुरुवातीच्या सामन्यातील पराभवाने निराश होणार नाही. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वातील खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत. त्यांची वरची फळी पहिल्या सामन्यात अपयशी ठरली आहे, मला विश्वास आहे की, पुढच्या सामन्यात हा संघ मजबूत पुनरागमन करेल. सीएसकेचा घातक अष्टपैलू मोईन अलीही पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता, पण दुसऱ्या सामन्यापासून तो उपलब्ध असणार आहे.”

पहिल्या सामन्यात सीएसकेला केकेआरने ६ विकेट्स राखून पराभूत केला होते. २६ मार्च रोजी खेळल्या गेगेल्या या सामन्यात सीएसकेने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सुमार प्रदर्शन केले. फलंदाजांमध्ये एकट्या एमएस धोनीने वयाच्या ४० व्या वर्षी ३८ चेंडूत ५० धावा ठोकल्या. त्याव्यतिरिक्त सीएसकेचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. तर गोलंदाजीच ड्वेन ब्रावोने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात सीएसकेकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती, जो ३१ मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला गेला. परंतु, या सामन्यातही सीएसकेला पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने २१० धावांचे मोठे आव्हान उभे केले होते. परंतु, प्रत्युत्तरात लखनऊने हे लक्ष्य १९.३ षटकात गाठले. या सामन्यात सीएसकेसाठी सलामीवीर रॉबिन उथप्पाने सर्वाधिक ५०, तर युवा शुभम दुबेने ४९ धावा केल्या. धोनी ६ चेंडूत १६ धावा करून नाबाद राहिला.

दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू मोईन अलीने संघात पुनरागमन केले. त्याने या सामन्यात २२ चेंडूत ३५ धावा केल्या. सीएसकेला या हंगामात त्यांच्या काही महत्वाच्या खेळाडूंची कमी जाणवू शकते, जे मागच्या हंगामात त्यांच्यासोबत होते. दक्षिण अफ्रिकी दिग्गज फाफ डू प्लेसिसला पुन्हा संघात घेण्यासाठी सीएसकेने पूर्ण प्रयत्न केले, पण आरसीबीने मोठी बोली लावत त्याला विकत घेतले आणि संघाचा कर्णधार बनवले. तसेच वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरही या हंगामात सीएसकेमध्ये नाहीय. शार्दुल या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

क्रिकेटच्या मैदानात फक्त पोरांमध्येच नाही पोरींमध्येही होतो राडा! पाहा महिला खेळाडूंच्या बाचाबाचीचा व्हिडिओ

चेन्नईच्या घशातून लखनऊ सामना हिसकावला, पण त्याला कारणीभूत ठरलेल्या ५ गोष्टी म्हणजे…

Video: लखनऊच्या बदोनीने चेन्नईच्या चाहतीचं फोडलं डोकं, जोरदार सिक्सरचा चेंडू आदळला मस्तकावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---