इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) २०२२मध्ये शुक्रवारी (दि. २० मे) चेन्नई सुपर किंग्जने चालू हंगामातील त्यांचा शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला. राजस्थानने हा सामना ५ विकेट्सने जिंकला. सीएसकेच्या चाहत्यांना पराभव जरी मिळाला असला, तर कर्णधार एमएस धोनीकडून त्यांना एक आनंदाची बातमी देखील मिळाली. आयपीएलच्या पुढच्या हंगामात देखील धोनीने खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज मॅथ्यू हेडनने धोनीच्या या निर्णयाबाबत स्वतःचे मत स्पष्टपणे व्यक्त केले.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) म्हणाला की, “हे प्रत्यक्षात अवघड आहे. हे यावर अवलंबून आहे की, फ्रँचायझीला काय अपेक्षित आहे. तुम्हाला जर असा कर्णधार हवा आहे, ज्याने चालू हंगामात १२८च्या स्ट्राईक रेटने २०० धावा केल्या आहेत, तर काहीच हरकत नाही. त्याच्या हातामध्ये अजूनही ताकत आहे, तो अजूनही खेळपट्टीवर वेगाने धावू शकतो. तो संपूर्ण आयपीएलमध्ये सर्वात जास्त अनुभव असलेला कर्णधार देखील आहे. मात्र, जेव्हा तो संघाला पुन्हा बनवायचा विचार करेल, तेव्हा पाहावे लागेल की, त्यामध्ये एमएस धोनी (MS Dhoni) किती योगदान देणार आहे.”
हेडनच्या मते धोनीला जर पुढच्या हंगामात खेळण्याची संधी दिली, तर हा सीएसकेचा भावनिक निर्णय असेल. “जर तुम्ही त्याचे प्रत्यक्षात योगदान पाहिले, तर मी म्हणेल की, त्याच्या खेळण्याची कुठेच संधी नाहीये. सॅमसनवर एक नजर टाकली, तर त्याने ३०च्या सरासरीने ३०० धावा केल्या आहेत आणि हा प्रश्न आहे की, कर्णधाराच्या रूपात त्याने मोठे योगदान दिले आहे का? तर या त्या गोष्टी आहेत, ज्याचे मोजमाप केले जाईल आणि हा एक खूपच भावनिक निर्णय असेल.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, एमएस धोनीने आयपीएल २०२२ हंगाम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते. रवींद्र जडेजाने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदीर स्वीकारली, पण त्याला ती पेलता आली नाही. अशात हंगामाच्या मध्यात धोनीने पुन्हा संघाचे कर्णधारपद स्वीकारले. अनेकांना असे वाटत होते की, धोनीचा हा शेवटचा हंगाम असेल, पण शुक्रवारी राजस्थानविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी त्याने मोठी घोषणा केली. धोनीने सांगितल्याप्रमाणे तो त्याचा शेवटचा सामना रांचीमध्ये खेळणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलचं टेन्शन विसरून श्रेयस अय्यर करतोय नुसता एंजॉय, बहिणीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी! मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ‘करो वा मरो’ सामन्यात दिल्लीच्या धडाकेबाज पठ्ठ्याचे कमबॅक