भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात त्याला एकही अर्धशतक झळकावत आले नव्हते. मात्र, अहमदाबाद कसोटीच्य पहिला डावात त्याने नाबाद अर्धशतक साजरे केले आहे. त्याचवेळी काही दिवसांनी सुरू होत असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये विराट खेळताना दिसेल. आयपीएलमधून विराट विश्वचषकाची तयारी करण्यावर भर देईल. अशी शक्यता ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने व्यक्त केली.
हेडन सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये समालोचक म्हणून भूमिका पार पाडताना दिसतोय. विराट कोहलीबाबत बोलताना तो म्हणाला,
“विराटसाठी 2016 आयपीएल हंगाम सर्वश्रेष्ठ राहिलेला. मला वाटते यावेळी देखील त्याच्यासाठी तसाच हंगाम असेल. या हंगामात तो वनडे विश्वचषकाची तयारी करताना दिसेल. आयपीएलमध्ये चांगला फॉर्म राहिल्यास तोच फॉर्म विश्वचषकावेळी कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल. मागील हंगाम तितका चांगला नव्हता त्यामुळे या हंगामात तो त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.”
आयपीएल 2023 ची सुरुवात 31 मार्चपासून होईल. नेतृत्व सोडल्यानंतर विराट प्रथमच बेंगलोरमध्ये खेळताना दिसणार आहे. 2019 आयपीएलनंतर पहिल्यांदा संपूर्ण हंगाम होम व अवे अशा पद्धतीने खेळला जाईल. आरसीबीच्या अपेक्षा यावेळी पुन्हा विराटच्या खांद्यावर असतील. तसेच, सप्टेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषक खेळला जाईल. हा विश्वचषक विराटच्या कारकिर्दीतील अखेरचा वनडे विश्वचषक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतः विराट देखील सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
(Matthew Hayden Thinking Virat Kohli Use IPL 2023 Preparation Of ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“कसोटी क्रिकेट वाचवायच्या फक्त गप्पा मारू नका”, आयसीसीवर संतापला मॅथ्यूज, वाचा संपूर्ण प्रकरण
बापाचा खेळ पाहून हरखल्या पोरी! उस्मान ख्वाजाच्या चिमुरड्यांचा ‘क्युट’ फोटो व्हायरल