आयपीएल २०२२चा साखळी फेरी सामन्यांचा टप्पा संपायला आला असून लवकरच बादफेरी सामन्यांना सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि प्लेऑफसाठी पात्रता मिळवणारा गुजरात टायटन्स हे संघ गुरुवारी (१९ मे) त्यांचा शेवटचा साखळी फेरी सामना खेळण्यासाठी आमने सामने आले होते. हा सामना बेंगलोरसाठी करा अथवा मरा सामना होता. मात्र या सामन्यादरम्यान गुजरातचा फलंदाज मॅथ्यू वेड आपल्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधले.
वेड (Matthew Wade) स्वस्तात बाद झाल्यानंतर पंचांच्या निर्णयावर नाखुश (Matthew Wade Unhappy On Umpire) दिसला. याचा राग त्याने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन व्यक्त केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
तर झाले असे की, गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली होती. मात्र त्यांना अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. त्यांचा सलामीवीर शुबमन गिल वैयक्तिक एका धावेवर बाद झाला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर वेड फलंदाजीसाठी आला होता. त्याने आक्रमक पवित्रा घेत विस्फोटक सुरुवात केली. मात्र १ षटकार व २ चौकारांच्या मदतीने अवघ्या १६ धावा केल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने त्याला पायचीत केले.
डावातील सहावे षटक टाकण्यासाठी आलेल्या मॅक्सवेलने दुसऱ्या चेंडूवर वेडला पायचीत केले. मात्र वेडने लगेच डीआरएससाठी अपील केली. चेंडू आपल्या बॅटला लागून गेला असल्याचे त्याचे म्हणणे होते. परंतु रिव्ह्यूमध्ये निकाल त्याच्या विरोधातच लागला. परिणामी त्याला मैदान सोडावे लागले.
https://twitter.com/harshid_17/status/1527302913999065088?s=20&t=AX7kU5atPvUtAQNwtPpzlg
Mathew Wade is upset that why his favourite bowlers ain’t allowed in IPL. https://t.co/e0tlDLh3hd
— Usama Zafar (@Usama7) May 19, 2022
https://twitter.com/Surajp__india/status/1527304236316229632?s=20&t=AX7kU5atPvUtAQNwtPpzlg
https://twitter.com/Surajp__india/status/1527304469817413633?s=20&t=AX7kU5atPvUtAQNwtPpzlg
पंचांच्या या निर्णयावर वेड पूर्णपणे नाखुश दिसला. पव्हेलियनला परतताना त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती. अखेर ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर त्याने आपला राग व्यक्त (Matthew Wade Anger) केला. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर त्याने हातात असलेले हेल्मेट जोराने रूममध्ये फेकले. यादरम्यान त्याच्या तोंडून अपशब्दही निघाले. त्यानंतर त्याने आपली बॅट जोराने ड्रेसिंग रूममधील सामनावर आदळत तोडफोड केली. त्याच्या या वर्तवणूकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चाहते यावर व्यक्त होत आहेत. अनेकांनी त्याच्या या वागणूकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान गुजरात आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे बेंगलोरविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी फक्त औपचारिकता होती. तर बेंगलोरसाठी मात्र हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. हा सामना जिंकत बेंगलोरकडे प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्याची संधी होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शॉकिंग! लाईव्ह सामन्यातच ३८ वर्षीय स्टार बॉक्सरला हृदयविकाराचा झटका, जागीच गमावले प्राण
क्रिकेटवरील प्रेम म्हणा वा संघनिष्ठा! तब्येत बरी नसतानाही लखनऊसाठी खेळला एविन लुईस, ठरला गेमचेंजर
ऐकलंत का? १७ कोटींनीही नाही भरलं केएल राहुलचं मन, अर्ध्या हंगामात केली पगार वाढीची मागणी!






