आयपीएल २०२१ चा ५६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडला. या सामन्यात आरसीबीने सात विकेट्स राखून विजय मिळवला. आरसीबीला या सामन्यानंतर श्रीकर भरतच्या रूपात एक नवीन धमाकेदार फलंदाज मिळाला आहे. सामन्याच्या शेटवच्या चेंडूवर षटकार मारून भरतने संघाला विजय मिळवून दिला आणि सर्वांची मने जिंकली आहेत. भरतने या सामन्यात आरसीबीसाठी ५२ चेंडूत ७८ धावांची नाबाद खेळी केली. यावेळी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने भरतची चांगली साथ दिली. सामना संपल्यानंतर भरतने मॅक्सवेलने कशाप्रकारे त्याला मोठी खेळी करण्यास आत्मविश्वास दिला? याबाबत खुलासा केला आहे.
शेवटच्या षटकात भरत आणि मॅक्सवेल यांच्यात काय चर्चा झाली होती याबाबत भरतने सामना संपल्यानंतर खुलासा केला आहे. भरत म्हणाला की, “शेवटच्या षटकामध्ये मी आणि मॅक्सवेलने चर्चा केली की, आम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये शॉट खेळू शकतो. त्याने सांगितले की, चेंडूला पाहा आणि शॉट मार. शेवटच्या तीन चेंडूत मी त्याला म्हटलो की, एक धाव घ्यायची आहे का? तर तो म्हणाला की, तूही मोठा शॉट खेळून विजय मिळवून देऊ शकतो. यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला.”
“मला शेवटच्या षटकाच्या आधी जास्त विचार करायचा नव्हता. मी जास्त गोष्टीवर लक्ष देण्यापेक्षा एकावेळी एकाच चेंडूवर लक्ष देत होतो. मी गोष्टींना सोपे बनवले. आम्ही संघाच्या रूपात चांगले प्रदर्शन केले आणि विजय मिळवला,” असेही त्याने म्हटले.
दरम्यान, सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी केली आणि मर्यादित २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर १६४ धावा केल्या होत्या. दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकांमध्ये ३ विकेट्सच्या नुकसानावर १६६ धावा केल्या. श्रीकर भरतच्या षटकाराच्या जोरावर आरसीबीने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. भरतव्यतिरिक्त आरसीबीनच्या ग्लेन मॅक्सवेलने ३३ चेंडूत ५१ धावांची नाबाद खेळी केली.
महत्वाच्या बातम्या-
तीन भारतीय खेळाडू, ज्यांना टी२० विश्वचषकापूर्वी निवडकर्ते दाखवू शकतात बाहेरचा रस्ता