ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रिकी पाँटिंग याने धक्कादायक विधान केले आहे. ग्लेन मॅक्सवेल याच्याबद्दल रिकी पाँटिंग म्हणाला की, “तो कसोटी खेळण्यास सक्षम नाही.”
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याच्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाबद्दल बोलताना रिकी पाँटिंग (Ricky Ponting) म्हणाला, “प्रथम श्रेणीमध्ये खूप धावा केल्याशिवाय कोणीही संधीस पात्र होत नाही. मला वाटत नाही की, तो त्यास पात्र आहे. पण जर मॅक्सवेलला पुनरागमन करायचे असेल, तर त्याने प्रथम श्रेणीत जावे, तेथे धावा केल्या पाहिजेत आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघात जबरदस्त पुनरागमन करावे.”
पॉन्टिंगपूर्वी ग्लेन मॅक्सवेल कसोटी संघात पुनरागमन करण्याबाबत म्हणाला, “मला सध्याच्या परिस्थितीची चांगली जाणीव आहे. ऑस्ट्रेलियन संघ खरोखर चांगले क्रिकेट खेळत आहे. तो कसोटी विजेता आहे. या ऑस्ट्रेलियन कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन संघ आहे.”
मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये ग्लेन मॅक्सवेलची बॅट ऑस्ट्रेलियासाठी खूप धावा करत आहे. मात्र, त्याची बॅट आतापर्यंत कसोटी फॉर्मेटमध्ये शांत राहिली आहे. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी फक्त 7 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 26.08 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलने नुकत्याच झालेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाला विश्वविजेते बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मॅक्सवेलने विश्वकप 2023 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावले होते. या सामन्यात त्याला स्नायूंचा त्रास होत होता. मात्र, दुखापतीनंतरही मॅक्सवेलने फलंदाजी सुरूच ठेवली आणि 201 धावा करत ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला. (Maxwell is not fit for Test cricket the statement of the Australian legend caused a sensation)
हेही वाचा
BREAKING! रोहित पर्वाचा शेवट, हार्दिक पंड्या बनला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार
बीसीसीआय सुरू करणार आयपीएलसारखी दुसरी लीग, पहा नक्की कसा असेल हा नवा फॉर्मेट