---Advertisement---

शाब्बास मयंक! केवळ ८ वा कसोटी सामना खेळताना केलाय हा मोठा कारनामा

On: शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2019 4:01 PM
---Advertisement---

इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात होळकर क्रिकेट स्टेडियमवर पहिला कसोटी सामना(1st Test) सुरु आहे. आज या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने(Mayank Agarwal)द्विशतकी खेळी केली आहे.

त्याने 303 चेंडूत 25 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने त्याचे हे द्विशतक(Double Century) पूर्ण केले. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक आहे. विशेष म्हणजे मयंकचा हा केवळ 8 वा कसोटी सामना आहे.

मयंकने त्याचे पहिले द्विशतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणमला याचवर्षी ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या कसोटी सामन्यात केले होते.

मयंकने हे द्विशतक करताना सुरुवातीला चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारीही केली. त्यानंतर त्याने अजिंक्य रहाणेला साथीला घेत चौथ्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी केली. पुजारा(54) आणि रहाणे(86) या दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली आहेत.

त्याचबरोबर भारताने पहिल्या डावात 350 धावांचा टप्पा पार केला आहे.

तत्पूर्वी या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद 150 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---