सध्या पॉंडेचेरी येथे देवधर ट्रॉफी खेळली जात आहे. सहा विभागांच्या या स्पर्धेत दक्षिण विभागाने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत चारही सामन्यात विजय साजरे केले. यासह दक्षिण विभागाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत देखील धडक मारली. संघाच्या या यशात कर्णधार मयंक अगरवाल यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. त्याने चारही सामन्यात दमदार कामगिरी करत, सर्वांची मने जिंकली.
दोन वर्षानंतर होत असलेल्या देवधर ट्रॉफीत दक्षिण विभागाचे नेतृत्व मयंक अगरवालकडे देण्यात आले होते. त्याने आपल्या अनुभवाचा फायदा उचलत स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्म दाखवला. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात उत्तर विभागाविरुद्ध त्याने 68 चेंडू 64 धावांची खेळी केली होती. त्यानंतर मजबूत पश्चिम विभागाविरुद्ध 98 धावांची सामना जिंकवणारी खेळी त्याने केली. नॉर्थ ईस्ट विरुद्ध देखील त्याच्या बॅटमधून 32 धावा आल्या होत्या. तर पूर्व विभागाविरुद्ध देखील त्याने 88 चेंडूवर 84 धावा बनवल्या. त्यानंतर, मध्य विभागाविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या सामन्यात देखील त्याच्याकडून अशाच खेळीची संघाला अपेक्षा असेल.
सध्या 32 वर्षाच्या असलेल्या मयंकणे भारतीय संघासाठी अखेरचा सामना मागील वर्षी श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत बंगलोर येथे खेळला होता. तर अखेरचा वनडे सामना 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळताना 41 पेक्षा जास्तच्या सरासरीने 1488 धावा केल्या आहेत. तर, वनडेत 5 सामन्यांमध्ये 86 धावा त्याच्या नावे आहेत. कर्नाटकसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या मयंकने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 93 सामने खेळताना 7093 धावा केल्या आहेत.
मयंक हा सलामीवीर म्हणून खेळत असतो. त्याला भारतीय संघात पुनरागमन करायचे झाल्यास कर्णधार रोहित शर्मा, युवा शुबमन गिल व यशस्वी जयस्वाल यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे.
(Mayank Agarwal Extreme Form In Deodhar Trophy 2023 )
महत्वाच्या बातम्या –
कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर ब्रॉडने मारला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ पाहून फिरतील तुमचेही डोळे
‘ब्रॉडी तुला सलाम’, ब्रॉडच्या रिटायरमेंटवर आली युवीची प्रतिक्रिया, शेअर केले खास छायाचित्र