IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारताने आपला संघ घोषित केला आहे. देशांर्तगत चालू असलेल्या रणजी ट्राॅफीमध्ये कोणता खेळाडू चांगलं प्रदर्शन करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. कदचित चांगलं प्रर्दशन करणाऱ्या एखाद्या खेळाडूची इंग्लंडविरूद्धच्या पुढील तीन सामन्यांसाठी संघात निवड होऊ शकते. पहिल्या दोन सामन्यांतील प्रर्दशनावर पुढील तीन सामन्यांसाठी संघाची निवड अवलंबून असेल.
चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) याने रणजी ट्रॉफीमध्ये(Ranji Trophy) जोरदार द्विशतक झळकावले आणि पुन्हा एकदा भारतीय संघाचं दार ठोठवलं आहे. सध्या पुजारा घरच्या मैदानावर चांगले प्रदर्शन करत आहे. त्याचसोबत मयंक अग्रवाल(mayank agarwal) यानेही रणजी ट्रॉफीत शतक झळकावले आहे. जर हे दोघे असंच खेळत राहिले तर इंग्लंडविरूद्धच्या पुढील 3 सामन्यांसाठी त्यांची संघात निवड केली जाऊ शकते. (mayank agarwal hundred in karnataka vs gujarat ranji trophy match ahead of england test series)
मयंकचे दमदार शतक
मयंक अग्रवाल सध्या रणजी स्ट्रॉफी खेळत आहे आणि तो कर्नाटक संघाचा कर्णधारही आहे. त्याने गुजरातविरूद्धच्या सामन्यात शतक ठोकले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत असून गुजरातने पहिल्या डावात 264 धावा केल्या तर कर्नाटकचा संघ पहिल्या डावात 374 धावा करून सर्वबाद झाला. यावेळी कर्णधार मयंकने शतकीय खेळी केली. त्याने यावेळी124 चेंडूत 17 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 109 धावा केल्या. मयंकच्या या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 110 धावांची आघाडी घेतली.
मयंक अग्रवाल रणजी ट्राॅफीत पंजाबविरूद्ध झालेल्या दोन्ही डावात शून्यवर बाद झाला होता. आणि आत्ता त्याने लावलेल्या शतकामुळे त्याचे मनोबल नक्कीच उंचावले असेल. मयंक अनेक दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने भारतीय संघाकडून शेवटचा कसोटी सामना मार्च 2022मध्ये खेळला होता. कसोटीतील खराब प्रदर्शनामुळे त्याला संघातून बाहेर रहावे लागले होते.
बॉक्सिंग डे कसोटीमधून केले आंतरराष्ट्रीय पदार्पण
मयंक अग्रवालने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात कसोटीमधून केला होती. डिसेंबर 2018मध्ये बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात त्याने पर्दापण केले होते. त्याने आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळले आहेत. यावेळी 41.33च्या सरासरीने त्याने 1488 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतक आणि 6 अर्धशतकांचाही समावेश आहे. मयंकला वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात सुद्धा संधी मिळाली होती परंतू यामध्ये तो पुर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने 5 वनडे सामन्यात 17.20च्या सरासरीने 86 धावा केल्या आहेत. (Ranji Trophy Ahead of Test series against England, Mayank’s Ranjit Dhumakul knocks on Indian team’s door)
महत्त्वाच्या बातम्या
IPLच्या पहिल्या हंगामातील ऑरेंज कॅप विजेत्या मार्शचा क्रिकेटला अलविदा, आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वीच माजवली होती खळबळ
आयपीएल सर्वांसाठी खास; यातूनच टी20 विश्वचषक संघ निवडला जाईल, इंदोर टी-20पूर्वी शिवम दुबेचे वक्तव्य