---Advertisement---

‘द्विशतकवीर’ मयंक अगरवालने मिळवले त्या ४ भारतीयांमध्ये मानाचे स्थान

---Advertisement---

विशाखापट्टण। बुधवारपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज(3 ऑक्टोबर) भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने द्विशतकी खेळी केली आहे.

त्याने या सामन्यात 371 चेंडूत 215 धावांची द्विशतकी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 23 चौकार आणि 6 षटकार मारले आहे. विशेष म्हणजे ही त्याची कसोटी क्रिकेटमधील पहिलीच शतकी खेळी आहे.

त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील पहिले शतक करताना 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा तो केवळ चौथा भारतीय ठरला आहे. याआधी भारताकडून असा पराक्रम करुण नायर, विनोद कांबळी आणि दिलीप सरदेसाई यांनी केला आहे.

मयंकला आज 215 धावांवर डीन एल्गारने बाद केले. त्याचा झेल डिन पायडने घेतला. त्याआधी मयंकने या डावात रोहित शर्माबरोबर 317 धावांची सलामी भागीदारी रचली आहे. रोहित या डावात 176 धावांवर बाद झाला.

या सामन्यात भारताने दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्राखेर पहिल्या डावात 124 षटकात 5 बाद 450 धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील पहिले शतक करताना 200+ धावांची खेळी करणारे भारतीय – 

303* धावा – करुण नायर (विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2016)

224 धावा – विनोद कांबळी (विरुद्ध इंग्लंड, मुंबई, 1993)

215 धावा – मयंक अगरवाल (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, विशाखापट्टणम, 2019)

200* धावा – दिलीप सरदेसाई (विरुद्ध न्यूझीलंड, मुंबई, 1965)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

या देशाकडे आहेत सर्वाधिक कसोटी शतकवीर; भारत आहे या क्रमांकावर

भारताकडून कसोटीत ८९ सलामीवीर खेळले, पण असा पराक्रम करणारा रोहित ठरला दुसराच

द्विशतक हुकले पण तरीही रोहितचा झाला या दिग्गजांमध्ये समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment