कालपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात विशाखापट्टणम येथे पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने आज दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात पहिल्या डावातील 88 षटकात 1 बाद 324 धावा केल्या आहेत.
भारताने आज पहिल्या सत्रात रोहित शर्माची विकेट गमावली. रोहितने या डावात 244 चेंडूत 176 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 23 चौकार आणि 6 षटकार मारले. मात्र रोहितचे द्विशतक केवळ 24 धावांनी हुकले आहे. असे असले तरी रोहितने एक खास पराक्रम केला आहे.
रोहित या सामन्यात पहिल्यांदाच कसोटी सलामीवीर म्हणून फलंदाजीला उतरला होता. त्यामुळे कसोटी सलामीवीर म्हणून पहिला डाव खेळताना सर्वाधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित चौथ्या क्रमांकावर आला आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचे ब्रेंडन कुरुप्पू असून त्यांनी न्यूझीलंड विरुद्ध सलामीवीर म्हणून पहिल्या डावात नाबाद 201 धावा केल्या होत्या.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ग्रॅमी स्मिथ आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळताना पहिल्या डावात 200 धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे. शिखरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलामीवीर म्हणून पदार्पण करताना 187 धावांची खेळी केली होती.
कसोटी सलामीवीर म्हणून पहिला डाव खेळताना सर्वाधिक धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू –
201* – ब्रेंडन कुरुप्पू (श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड, 1987)
200 – ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, 2002)
187 – शिखर धवन (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2013)
176 – रोहित शर्मा (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2019)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–अखेर ८२ षटकानंतर दक्षिण आफ्रिकेला मिळाली टीम इंडियाची पहिली विकेट…






