Loading...

जेव्हा विराट कोहली भेटतो त्याच्या ‘जबरा फॅन’ला…

विशाखापट्टणम| भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला जगभरात लाखो चाहते आहे. त्याला या चाहत्यांकडून विविधप्रकारे प्रेम मिळत असते. नुकताच काही दिवसांपूर्वी विराटला त्याचा एक मोठा चाहता भेटला होता. या चाहत्याच्या शरिरावर विराटचे काही टॅटू आहेत.

या चाहत्याचे नाव पिंटू बेहरा असून तो ओडीसाचा राहणारा आहे. त्याने आपल्या छातीवर विराट कोहलीच्या चेहऱ्याचा टॅटू काढला आहे.

तसेच त्याच्या पाठीवर, विराटचं प्रथम नाव आणि विराटचा 18 हा जर्सी क्रमांकाचा टॅटू काढलेला आहे. त्याचबरोबर विराटच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या टप्प्याचा तपशीलाचाही या टॅटूमध्ये समावेश आहे.

यामध्ये विराटच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय संघाने जिंकलेला 2008 चा 19 वर्षाखालील विश्वचषक, 2013 ला विराटला मिळालेला अर्जून अवॉर्ड आणि 2017 मध्ये मिळालेला पद्मश्री पुरस्कार काही महत्त्वाच्या तपशीलाचा समावेश आहे.

सध्या विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून(2 ऑक्टोबर) सुरु झाला आहे.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या – 

हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, रोहित ‘हिट’ है भाई…

विंडीजमध्ये संधी न मिळालेल्या त्या भारतीय खेळाडूबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन म्हणाला…

जगातील त्या ८ खेळाडूंमध्ये रोहित शर्माचे नाव सन्मानाने घेतले जाणार

You might also like
Loading...