विंडीजमध्ये संधी न मिळालेल्या त्या भारतीय खेळाडूबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन म्हणाला…

भारतीय संघाची आजपासून(2 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणमला खेळवला जात आहे. या सामन्यातून भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात पुनरागमन करण्यात फिरकीपटू आर अश्विनला यश मिळाले आहे.

अश्विनला मागील काही कसोटी सामन्यात भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळत नव्हती. त्याला ऑगस्टमध्ये भारताच्या वेस्ट इंडीज दौऱ्यात झालेल्या कसोटी मालिकेतील दोन्ही कसोटीतही खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली होती.

आता भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने अश्विन भारतीय संघाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, ‘अश्विन हा प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने फक्त गोलंदाजीतच चांगली कामगिरी केली असे नाही तर फलंदाजी करताना महत्त्वपूर्ण धावाही केल्या आहेत. त्यामुळे मला वाटते की यात काहीही शंका नाही की तो या भारतीय संघाचा अविभाज्य घटक आहे.’

तसेच सचिन म्हणाला, ‘मला वाटते, प्रत्येकाच्या कारकीर्दीत चढ-उतार येतात. अश्विन बराच काळापासून भारतीय संघात आहे आणि त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. माझ्यासाठी अश्विन या भारतीय संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे.’

त्याचबरोबर आजपासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील कसोटी मालिकेत भारत विजयाचा प्रबळ दावेदार असेल असेही सचिनने म्हटले आहे. पण याबरोबरच त्याने दक्षिण आफ्रिकाही कडवी झुंज देऊ शकते असा इशाराही त्याने भारताला दिला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

जगातील त्या ८ खेळाडूंमध्ये रोहित शर्माचे नाव सन्मानाने घेतले जाणार

टीम इंडियाने असा दिला ‘स्वच्छ भारत अभियानाला’ पाठिंबा…

ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणे नक्कीच सोपं नव्हतं, रोहितने इतिहास घडवलाच!

You might also like