टीम इंडियाने असा दिला ‘स्वच्छ भारत अभियानाला’ पाठिंबा…

आज (2 ऑक्टोबर) देशभरात महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. तसेच देशात ‘स्वच्छ भारत अभियाना’ला सुरुवात होऊन 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने भारतीय क्रिकेट संघानेही राष्ट्रपिता गांधींना आदरांजली वाहून स्वच्छ भारत अभियानात भाग घेतला आहे.

भारतीय संघाची आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज विशाखापट्टणममध्ये सुरु झाला. या सामन्यातील आज पहिल्या दिवशी भारतीय संघातील खेळाडूंनी त्यांच्या जर्सीवर स्वच्छ भारत मोहिमेचं स्टिकर लावून या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे.

याचा फोटो बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या फोटोत दिसते की भारतीय खेळाडूंनी त्यांच्या जर्सींच्या बाह्यांवर स्वच्छ भारत अभियानाचा लोगो असलेले स्टिकर लावले आहे.

तसेच बीसीसीआयने ट्विट केले आहे की ‘ महात्मा गांधींच्या 150व्या जयंती दिवशी स्वच्छता क्रांतीला 5 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भारतीय संघ पुन्हा स्वच्छ भारत अभियानात सामील झाला.’

आजपासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 59.1 षटकात बिनबाद 202 धावा केल्या आहेत.

भारताकडून पहिल्या दिवसाखेर सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा 174 चेंडूत 115 धावांवर नाबाद आहे. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. तर मयंक अगरवाल 183 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 84 धावांवर नाबाद खेळत आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणे नक्कीच सोपं नव्हतं, रोहितने इतिहास घडवलाच!

रोहितला जगातील टॅलेंटेड खेळाडू का म्हणतात त्याच कारण आज मिळालंच

असं टायमिंग भल्या भल्यांना जमलं नाही, रोहितचा नादच खुळा

You might also like