जगातील त्या ८ खेळाडूंमध्ये रोहित शर्माचे नाव सन्मानाने घेतले जाणार

विशाखापट्टणम। आजपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताकडून पहिल्यांदाच कसोटीत सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे.

रोहितने आज पहिल्या दिवसाखेर 174 चेंडूत 115 धावांची नाबाद खेळी केली आहे. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. रोहितचे हे कसोटी सलामीवीर म्हणून पहिलेच शतक आहे.

त्यामुळे तो सलामीवर म्हणून कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 या तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारात शतक करणारा पहिलाच भारतीय तर जगातील एकूण आठवा खेळाडू ठरला आहे.

याआधी असा विक्रम ख्रिस गेल, ब्रेंडन मॅक्यूलम, मार्टिन गप्टिल, तिलत्करने दिलशान, अहमद शेहजाद, शेन वॉट्सन आणि तमिम इक्बाल यांनी केला आहे. आता यात रोहितचेही नाव सामील झाले आहे.

या आठही फलंदाजांच्या नावावर कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट प्रकारात प्रत्येकी किमान एक तरी शतक आहे.

रोहितने आत्तापर्यंत सलामीवीर म्हणून वनडेत 25 शतके केली आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सलामीवीर म्हणून 4 शतके केली आहेत.

आजपासून विशाखापट्टणमला सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 59.1 षटकात बिनबाद 202 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहितने नाबाद शतक केले आहे. तर मयंक 183 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 84 धावांवर नाबाद खेळत आहे.

या सामन्यात आज पावसाचा व्यत्यय आल्याने पहिल्या दिवसाचा खेळ दुसऱ्या सत्रानंतर रद्द करण्यात आला आहे.

कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट प्रकारात शतक करणारे सलामीवीर –

ख्रिस गेल – वेस्ट इंडीज

ब्रेंडन मॅक्यूलम – न्यूझीलंड

मार्टिन गप्टिल – न्यूझीलंड

तिलत्करने दिलशान – श्रीलंका

अहमद शेहजाद – पाकिस्तान

शेन वॉट्सन – ऑस्ट्रेलिया

तमिम इक्बाल – बांगलादेश

रोहित शर्मा – भारत

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

टीम इंडियाने असा दिला ‘स्वच्छ भारत अभियानाला’ पाठिंबा…

ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणे नक्कीच सोपं नव्हतं, रोहितने इतिहास घडवलाच!

रोहितला जगातील टॅलेंटेड खेळाडू का म्हणतात त्याच कारण आज मिळालंच

You might also like