---Advertisement---

असा कारनामा करणारा मयंक अगरवाल रोहित शर्मानंतरचा दुसराच खेळाडू

On: शनिवार, नोव्हेंबर 16, 2019 1:02 PM
---Advertisement---

इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश संघात होळकर क्रिकेट स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात शुक्रवारी(15 नोव्हेंबर) भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने द्विशतकी खेळी केली.

त्याने भारताकडून शुक्रवारी पहिल्या डावात खेळताना 303 चेंडूत षटकार खेचत त्याचे कारकिर्दीतील दुसरे द्विशतक पूर्ण केले. त्याने या डावात 330 चेंडूत 243 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 28 चौकार आणि 8 षटकार मारले.

याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे. तो षटकार मारत द्विशतक पूर्ण करणारा दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी असा कारनामा मयंकचा सलामीवीर साथीदार रोहित शर्माने केला आहे.

रोहितनेही याचवर्षी रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळताना षटकार मारत त्याचे द्विशतकी पूर्ण केले होते.

असा पराक्रम करणाराही मयंक दुसराच क्रिकेटपटू –

त्याचबरोबर मयंक हा कसोटीत एका डावात 8 षटकार मारणारा भारताचा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी असा पराक्रम भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला आहे. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध 1994 ला लखनऊ येथे 124 धावांची खेळी करताना 8 षटकार मारले होते.

#कसोटीत षटकार मारत द्विशतक पूर्ण करणारे भारतीय फलंदाज – 

रोहित शर्मा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रांची, 2019

मयंक अगरवाल – विरुद्ध बांगलादेश, इंदोर, 2019

#एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू –

8 षटकार – मयंक अगरवाल (विरुद्ध बांगलादेश, 2019)

8 षटकार – नवज्योत सिंग सिद्धू (विरुद्ध श्रीलंका, 1994)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---