एशिया कप (Asia Cup) २०२२ स्पर्धेसाठी भारताचा संघ सोमवारी (८ ऑगस्ट) जाहीर करण्यात आला. १५ जणांच्या या संघामध्ये काहींना संधी मिळाली तर काहींची निराशा झाली आहे. यातील काही खेळाडू टी२० प्रकारामध्ये विशेष कामगिरीही करू शकले नाही. एवढेच नाही तर त्या खेळाडूने भारताकडून एकही आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळलेला नाही. त्याच खेळाडूने नुकतेच एका टी२० लीगमध्ये धमाकेदार खेळी केली आहे.
मयंक अगरवाल (Mayank Agarwal) असे त्या खेळाडूचे नाव असून त्याने कर्नाटकच्या महाराजा (केएससीए) टी२० लीगमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने बेंगलुरू ब्लास्टर्सकडून खेळताना २५ चेंडूत ५२ धावांची खेळी केली आहे. तसेच त्याने संघाचे नेतृत्व करताना कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आहे. त्याच्या या अर्धशतकामुळे संघाच्या धावसंख्येत भर पडली.
ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या या महाराजा टी२० लीगच्या गुलबर्गा मिस्टीक विरुद्ध बेंगलुरू ब्लास्टर्स या तिसऱ्या सामन्यात मयंकने ही आकर्षक खेळी केली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलुरू संघाने २० षटकात ८ बाद १८९ धावा केल्या. ही धावसंख्या उभारण्यासाठी मयंकने सलामीला येत स्फोटक खेळी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याने २०८च्या स्ट्राईक रेटने खेळताना ७ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. या सामन्यातील त्याचीच खेळी सर्वोत्तम ठरली आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुलबर्गचा संघ १९.१ षटकात १३५ धावातच गारद झाला. यामुळे गुलबर्गने हा सामना ५४ धावांनी गमावला.
मयंकने भारतासाठी एकही टी२० सामना खेळला नाही
मयंकला एशिया कपसाठी निवडले गेले नाही तसेच त्याने भारताकडून टी२०मध्ये पदार्पणही केलेले नाही. त्याने शेवटचा आतंरराष्ट्रीय कसोटी सामना मार्च २०२२मध्ये खेळला आहे. तर शेवटचा वनडे सामना नोव्हेंबर २०२०मध्ये खेळला आहे.
मयंकसाठी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम निराशाजनक ठरला. मात्र त्याने कर्नाटकच्या टी२० लीगमध्ये ज्याप्रकारे फलंदाजी केली आहे, यावरून त्याची फलंदाजीची लय परतली असून त्याचा आत्मविश्वास देखील वाढला असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अबब! ‘हा’ स्पिन पाहिल्यावर तुम्ही शेन वॉर्न अन् मुरली धरनलाही विसरून जाल
‘मिशन एशिया कप’ फत्ते करण्यासाठी कोहलीने बनवलाय प्लॅन, मुंबईतून करणार सुरुवात
शॉकिंग! दिग्गज क्रिकेट अंपायरचा कार अपघातात जागीच मृत्यू, भारताशी होते खास नाते