इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर विजय मिळवला होता. तर पहिला कसोटी सामना अनिर्णीत आणि दुसरा कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे.
या दौऱ्यावर भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांना अजूनपर्यंत खेळायची संधी मिळाली नाहीये. तसेच असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, या खेळाडूंना आगामी कसोटी सामन्यात देखील संधी मिळणार नाही. चला तर जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल.
मयंक अगरवाल :
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालला पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम ११ जणांच्या संघामध्ये संधी दिली जाणार होती. शुबमन गिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्यानंतर डावाची सुरुवात करण्यासाठी त्याला प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी तो दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे केएल राहुलला डावाची सुरुवात करण्याची संधी देण्यात आली होती.
राहुलने देखील मिळालेल्या संधीचे सोने करत अप्रतिम फलंदाजी केली होती. त्याने लॉर्ड्स कसोटीत तुफानी शतक झळकावले होते. त्यामुळे मयंक अगरवाल फिट असला, तरी देखील इंग्लंड दौऱ्यावर त्याला संधी मिळणे कठीण दिसून येत आहे.
अभिमन्यु ईश्वरन:
अभिमन्यु ईश्वरनची इंग्लंड दौऱ्यावर सलामीवीर फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. परंतु, त्याला अजूनपर्यंत संघात खेळण्याची संधी देण्यात आली नाही. रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघेही सलामीवीर फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. तसेच पृथ्वी शॉला देखील सलामीवीर फलंदाज म्हणून इंग्लंडला बोलावण्यात आले आहे. ज्यामुळे अभिमन्यु ईश्वरनला अंतिम ११ जणांच्या संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उमेश यादव :
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या ३ कसोटी सामन्यात संधी देण्यात आली नाही. या मालिकेतील दोन सामने शिल्लक आहेत. या दोन्ही सामन्यात त्याला संधी मिळणे कठीण दिसून येत आहे. ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. तसेच पुढील सामन्यात ईशांत शर्माला संधी मिळणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु, त्याच्याऐवजी उमेश यादवला नव्हे, तर आर अश्विनला संधी दिली जाणार आहे. त्यामुळे, उमेश यादवला देखील इंग्लंड दौऱ्यावर प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणे कठीण आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वॉशिंग्टन सुंदरची दुखापत ‘या’ खेळाडूसाठी ठरू शकते वरदान; टी२० विश्वचषकासाठी होऊ शकते निवड
उंच उडीमध्ये भारताला ‘दुहेरी’ यश! मरियप्पणने पटकावले ‘रौप्य’, तर शरदच्या नावे ‘कांस्य’
अवनी लेखराच्या यशाने भारावला संपूर्ण देश; क्रीडाविश्वातूनही होतोय कौतुकाचा वर्षाव