आयपीएलच्या १३ व्या हंगामातील रविवारी (१८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघात रोमांचक सामना झाला. या सामन्यात २ सुपर ओव्हर झाल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने विजयाला गवसणी घातली. दुसऱ्या सुपर ओव्हरदरम्यान पंजाबचा धडाकेबाज फलंदाज मयंक अगरवालचे शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले.
झाले असे की, दुसऱ्या सुपर ओव्हरदरम्यान मुंबई संघ प्रथम फलंदाजी करत होता. मुंबईकडून खेळताना अष्टपैलू कायरन पोलार्डने पंजाबचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनच्या सहाव्या चेंडूवर चेंडू बाऊंड्रीच्या दिशेने फटकावला. त्यावेळी बाऊंड्री लाईनवर मयंक क्षेत्ररक्षण करत होता.
मयंकने उडी मारत षटकार जाणारा चेंडू अडवला आणि हवेतच तो चेंडू बाऊंड्रीच्या आत फेकला आणि षटकार रोखला. त्यामुळे मुंबईला ११ धावाच करता आल्या. हे आव्हान पंजाबने १५ धावा पूर्ण करत पार केले.
त्याच्या या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मयंकचे असे क्षेत्ररक्षण करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही त्याने असा कारनामा केला होता. त्याचा तो व्हिडिओ एका चाहत्याने ट्विटरवर शेअर केला आहे.
https://twitter.com/urmilpatel21/status/1317897646703579137
रविवारी झालेल्या सामन्यात मयंकने जसा चेंडू अडवला होता, अगदी तसाच चेंडू तो या व्हिडिओत अडवताना दिसत आहे. चाहत्याने या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले की, “मयंकची ही पहिली वेळ नव्हती.”
Not the first time….#mayank@mayankcricket pic.twitter.com/DofARV8OuT
— 🄺🄾🄷🄻🄸🄵🄸🄴🄳 (@YuviRam16) October 19, 2020
हा व्हिडिओ आयपीएल २०१५ मधील आहे. त्यावेळी मयंक दिल्ली डेअरडेविल्स (आताचा दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळत होता.
आयपीएल २०२० मध्ये मयंक चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३९३ धावा कुटल्या आहेत. या धावांसह तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई वि. पंजाब या ऐतिहासिक सामन्यातील खरा हिरो ‘हा’ एकच; जाणून घ्या कामगिरी
-…म्हणून दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मयंक अगरवालने सुपर ओव्हरमध्ये केली नाही फलंदाजी
-आता सचिनसह राहुल आणि मयंक अगरवालचेही ‘या’ विक्रमात घेतले जाणार नाव
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-सुपर ओव्हर टाकायचीये? पाहा प्रत्येक संघातील ‘अशा’ खास खेळाडूंची नावे
-मॅच टाय झाल्यावर सुपर ओव्हर, पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यावर काय?? जाणून घ्या