ईरानी ट्रॉफी 2023 साठी रेस्ट ऑफ इंडिया संघाची गोषणा केली गेली आहे. रणजी ट्रॉफीच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणारा मयंक अगरवाल याला संघाचा कर्णधार बनवले गेले आहे. तसेच रणजी ट्रॉफीच्या मागच्या तीन हंगामात जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या सरफराज खान याला मात्र संघात निवडले गेले नाहीये. दुखापतीमुळे सरफराज खानला या संघात निवडले गेले नसल्याचे सांगितले जात आहे.
मागच्या वर्षीचा विजेता संघ मध्य प्रदेश आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील हा ईरानी ट्रॉफीचा सामना 1 ते 5 मार्च रोजी खेळला जाणार आहे. मागच्या तीन रणझी हंगामात जवळपास 3000 धावा कुटणारा सरफराज खान () या सामन्यात खेळणार नसल्यामुळे सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. सरफराज सद्या ताची आयपीएल हंघ दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला आहे. तसेच माध्यमांमध्ये त्याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याची माहितीही दिली गेली आहे. पुढचे 8 ते 10 दिवस त्याला आराम करण्याचा सल्ला मिळाल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
रेस्ट ऑफ इंडिया संघात टॉप ऑर्डर फलंदाजांसाठी बंगालचा सुदीप घरामी, मुंबईचा यशस्वी जयसवाल, तामिळनाडूचा बाबा इंद्रजीत आणि दिल्लीचा यश धूल यांना निवडले गेले आहे. तसेच डावाची सुरुवात कर्णधार मयंक अगरवासह अभिमन्यू ईश्वरन करू शकतो. यावर्षी सौराष्ट्रला रणजी ट्रॉफी जिंकवून देणारा हार्विक देसाई आणि चेनत साकरिया देखील या संघात आहेत. आपल्या घातक गोलंदाजीने प्रभावित करणारा बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि आकाश दीप यांनाही संघात घेतले गेले आहे. नवदीप सैनी यानेही फिटनेस प्राप्त केल्यानंतर संघाक पुनरागमन केले आहे. केरळचा जलज सक्सेना आणि मुंबईचा शम्स मुलानी यांना मात्र संघात जागा मिळाली नाही.
मध्य प्रदेश आणि रेस्ट ऑफ इंडिया संघातील हा सामना मध्य प्रदेषच्या ग्वालियरमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार होता. पण बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेचा तिसरा सामना इरमशाला ऐवजी इंदोरमध्ये आयोजित केल्यामुळे ईरनी ट्रॉफी ग्वालियरला हलवण्यात आली.
रेस्ट ऑफ इंडिया संघ:
मयंक अग्रवाल (कप्तान) सुदीप घरामी, यशस्वी जायसवाल, अभिमन्यु ईश्वरन, हार्विक देसाई (विकेटकीपर), मुकेश कुमार, अतीत शेठ, चेतन साकरिया, नवदीप सैनी, उपेंद्र यादव (विकेटकीपर), मयंक मार्कंडेय, सौरभ कुमार, आकाश दीप, बाबा इंद्रजीत, पुल्कित नारंग, यश ढुल
मध्य प्रदेश संघ:
रजत पाटीदार, यश दुबे, हिमांशु मंत्री (कप्तान और विकेटकीपर), हर्ष गवली, शुभम शर्मा, वेंकटेश अय्यर, अक्षत रघुवंशी, अमन सोलंकी, कुमार कार्तिकेय, सारांश जैन, आवेश ख़ान, अंकित कुशवाह, गौरव यादव, अनुभव अग्रवाल, मिहिर हिरवानी
(Mayank Akarwal gets Rest of India captaincy, Sarfraz Khan out of squad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एस सिनियर, तीन जुनियर! द्रविडच्या एका इशाऱ्यावर चार भारतीय खेळाडूंचे भविष्य ठरणार
‘इज्जत दिली, तर इज्जत मिळेल’, इंग्लंड क्रिकेट संघाला आर अश्विन असे का म्हणाला? जाणून घ्याच