इंग्लंड क्रिकेट संघ सध्या अव्वल दर्जाचे कसोटी क्रिकेट खेळत आहे. इंग्लंडचा कसोटीत असलेल्या दबदब्याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, त्यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांच्याच संघाला एकही कसोटी सामना जिंकू दिला नाही. तसेच, तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0ने खिशात घातली. जेव्हापासून न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक बनला आहे, तेव्हापासून इंग्लंडने बेझबॉल क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. खरं तर, मॅक्युलमला ‘बेझ’ या नावाने ओळखले जाते. अशाप्रकारच्या क्रिकेटमध्ये इंग्लंड आक्रमकरीत्या खेळतो. भारताचा फिरकीपटू आर अश्विन मात्र याला योग्य मानत नाही. तो म्हणालाय की, प्रत्येक वेळी संघ अशाप्रकारचे क्रिकेट खेळू शकत नाही.
सध्या न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड (New Zealand vs England) संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जातेय. यातील पहिला सामना इंग्लंडने 267 धावांच्या अंतराने जिंकला होता. दुसरा कसोटी सामना वेलिंग्टन येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावातही इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारली होती. त्यांनी 8 विकेट्स गमावत 435 धावांवर डाव घोषित केला होता.
खेळपट्टीचा करावा लागतो सन्मान
अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बेझबॉल क्रिकेट (Bazball Cricket) याबाबत बोलताना म्हटले की, तुम्ही प्रत्येक खेळपट्टीवर अशाप्रकारचे क्रिकेट खेळू शकत नाही. तुम्हाला खेळपट्टीच्या हिशोबाने क्रिकेट खेळावे लागते. अश्विन म्हणाला की, “तुम्ही टी20 क्रिकेटप्रमाणे प्रत्येक चेंडूला मारू शकत नाही. आपण आता बेझबॉलची संकल्पना स्वीकारली आहे. इंग्लंड सध्या खूपच वेगाने क्रिकेट खेळत आहे. त्यांना निश्चित प्रकारच्या शैलीचे क्रिकेट खेळायचे आहे. मात्र, काही खास प्रकारच्या खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही प्रत्येक चेंडूला मारण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही अडखळता. याचे फायदेही आहेत आणि नुकसानही. अनेकदा तुम्हाला खेळपट्टीच्या स्थितीचा सामना करावा लागतो.”
प्रशिक्षकाच्या सल्ल्याची आठवण
अश्विनने आपले मत पटवून देण्यासाठी त्याचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमन यांच्या सल्ल्याची आठवण करून दिली. तो म्हणाला की, “डब्ल्यूव्ही रमन मला म्हणायचे की, हॅलो मिस्टर, परिस्थितीला आव्हान देऊ नको. तू बीचवर जाऊन त्याप्रकारे पोहू शकतो का, ज्याप्रकारे स्विमिंग पूलमध्ये पोहतो? तुम्ही असे करू शकत नाही. अशाप्रकारे तुम्हाला खेळपट्टीचा आदर करावा लागतो आणि त्यानुसार खेळावे लागते. जर तुम्ही आदर केला, तर खेळपट्टी तुमचा आदर करेल.”
इंग्लंडने जेव्हापासून बेझबॉल क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे, तेव्हापासून ते भारत दौऱ्यावर आले नाहीयेत. आता इंग्लंड 2024मध्ये जेव्हा भारत दौऱ्यावर येईल, तेव्हा कशी कामगिरी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (spinner ravichandran ashwin speak on england bazball cricket read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूला दुर्लक्षित करून ऑस्ट्रेलियाने केली मोठी चूक, भारतीय दिग्गजाचा खुलासा
हरमनच्या रनआऊटची चर्चा थांबेना! बाद करणारी खेळाडू म्हणतेय, “तिने बेजबाबदारपणा दाखवला”