Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेन वॉर्नचा कसोटी रेकॉर्ड तोडण्यासाठी अँडरसन सज्ज! हव्या आहेत फक्त ‘एवढ्या’ विकेट्स

शेन वॉर्नचा कसोटी रेकॉर्ड तोडण्यासाठी अँडरसन सज्ज! हव्या आहेत फक्त 'एवढ्या' विकेट्स

February 25, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला असून दुसरा सामना शुक्रवारी (24 फेब्रुवारी) सुरू झाला. वेलिंगटनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन भेदक गोलंदाजी करताना दिसत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अँडरसनने तीन विकेट्स घेतल्या आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील मोठा विक्रम मोडण्याच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे टाकले.

वेलिंगटन कसोटीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन बाद 315 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 8 बाद 435 धावा केल्या आणि डाव घोषित केला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी मात्र एकापाठोपाठ स्वस्तात विकेट्स गमावल्या. जेम्स अँडरसन (James Anderson) आणि फिरकीपटू जॅक लीच (Jack Leach) यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याआधी यजमान न्यूझीलंड संघाने 7 बाद 138 धावा केल्या आहेत. 40 वर्षीय अँडरसन लवकरच ऑस्ट्रेलियन माजी दिग्गज शेन वॉर्न (Shane Warne) यांचा विक्रम मोडीत काढू शकतो.

अँडरसनच्या नावावर शनिवारचा खेळ संपल्यानंतर 685 कसोटी विकेट्सची नोंद झाली. या फॉरमॅटमध्ये 700 विकेट्सचा टप्पा पार करणारा अँडरसन लवकरच तिसरा गोलंदाज ठरू शकतो. तसेच सर्वाधिक कसोटी विकेट्सच्या बाबतीत दुसरा क्रमांक देखील तो येत्या काळात पटकावू शकतो. शेन वॉर्न 708 कसोटी विकेट्सह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अँडरसनला वॉर्नचा विक्रम मोडण्यासाठी अजून 24 विकेट्सची आवश्यकता आहे. येत्या जून महिन्यात ऍशेस मालिका खेळताना अँडरसन ही कामगिरी करू शकतो. श्रीलंकन दिग्गज मुथय्या मुरलीधरन (Muthaiya Muralidharan) 800 कसोटी विकेट्सह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मुरलीधरनचा विक्रम मोडणे अँडरनसाठी कठीण आहे, पण येत्या काही सामन्यांमध्ये तो नक्कीच वॉर्नचा विक्रम मोडीत काढू शकतो.

जेम्स अँडरनसने इंग्लंडसाठी त्याचा पहिला कसोटी सामना 2003 साली खेळला होता. लवकरच तो कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःचे 20 वर्ष पूर्ण करणार आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडसाठी 179 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 25.88च्या सरासरीने 685 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी फॉरमॅटमध्ये त्याने 32 वेळा 5विकेट्सचा हॉल नावावर केला आहे. तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याने 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत अँडनसनने पॅट कमिन्सला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. (James Anderson may soon overtake Shane Warne for most Test wickets)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चालू सामन्यात गोलंदाजाला मारण्यासाठी धावला बाबर आझम; ऍक्शन कॅमेऱ्यात कैद, डिलीट होण्यापूर्वी पाहा व्हिडिओ
‘मला नेहमीच फेल कर्णधार मानले गेले’, धोनीसोबतच्या नात्यावरही बोलला विराट कोहली


Next Post
Harmanpreet-Kaur-And-Anushka-Sharma

सर्व बाजूंनी टीका होत असताना हरमनप्रीतला मिळाला अनुष्काचा पाठिंबा; म्हणाली, 'तुझा आणि तुझ्या संघाचा...'

Azam Khan

'माशाल्लाह फिटनेस तगडीच आहे...', जास्त वजनामुळे आझम खानला पाकिस्तान संघात संधी मिळत नाहीये?

Photo Courtesy: Twitter/ICC

इंदोर कसोटीआधी हेडने सांगितला ऑस्ट्रेलियाचा प्लॅन! म्हणाला, "आम्ही सुरुवातीपासूनच..."

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143