Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्टोक्सचा भीम पराक्रम! कसोटीत केली कुणालाही न जमलेली कामगिरी; प्रशिक्षक मॅक्युलमचाही विक्रम मोडला

स्टोक्सचा भीम पराक्रम! कसोटीत केली कुणालाही न जमलेली कामगिरी; प्रशिक्षक मॅक्युलमचाही विक्रम मोडला

February 18, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Ben-Stokes

Photo Courtesy: Twitter/englandcricket


इंग्लंड क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला 16 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स याला मोठी खेळी साकारता आली नाही, पण त्याने जेवढ्या धावा केल्या आणि चौकार-षटकार मारले, त्यामध्ये त्याने थेट इतिहास रचला. विशेष म्हणजे, या विक्रमात त्याने इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या ब्रेंडन मॅक्युलम यालादेखील पछाडले.

बेन स्टोक्सचा विक्रम
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना इंग्लंडने 9 विकेट्स गमावत 325 धावांवर डाव घोषित केला होता. या डावात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने 28 चेंडूंचा सामना करत 19 धावा कुटल्या. या धावा करताना त्याने 3 चौकारही मारले. यानंतर इंग्लंडने न्यूझीलंड संघाचा डाव 306 धावांवर संपुष्टात आणला. पुढे इंग्लंडच्या दुसऱ्या डावात स्टोक्सने 33 चेंडूत 31 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 3 चौकारांची बरसातही केली. दुसऱ्या डावात मारलेल्या 2 षटकारांमुळे स्टोक्सच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.

Mood 🦅

🇳🇿 #NZvENG 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 pic.twitter.com/RDo4hS9Nod

— England Cricket (@englandcricket) February 17, 2023

मोडला प्रशिक्षकाचा विक्रम
बेन स्टोक्स हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार (Ben Stokes Most Sixes In Test Cricket) मारणारा अव्वल खेळाडू बनला. या यादीत दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा माजी खेळाडू आणि सध्या इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक असलेला ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) हा आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 107 षटकार मारले आहेत. अशाप्रकारे स्टोक्सने प्रशिक्षक मॅक्युलमचाही विक्रम मोडला.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) आहे. त्याने कसोटी 100 षटकार मारले आहेत. या यादीत वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) हा 98 षटकारांसह चौथ्या स्थानी आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज जॅक कॅलिस हा पाचव्या स्थानी असून त्याने कसोटीत एकूण 97 षटकार मारले आहेत. यानंतर यादीत सहाव्या स्थानी भारतीय माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग असून त्याने 91 षटकार मारले आहेत. (Ben Stoeks Has Most 109 Sixes in Test Cricket)

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
109 षटकार- बेन स्टोक्स*

107 षटकार- ब्रेंडन मॅक्युलम
100 षटकार- ऍडम गिलख्रिस्ट
98 षटकार- ख्रिस गेल
97 षटकार- जॅक कॅलिस
91 षटकार- वीरेंद्र सेहवाग

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेतन शर्मांनंतर कोण होणार भारताचा नवीन मुख्य निवडकर्ता? टीम इंडियाच्या माजी सलामीवीराचं नाव चर्चेत
टेन्शन वाढलं! दिल्ली कसोटीत बलाढ्य संघाला झटका; चालू सामन्यातून दमदार खेळाडू होणार बाहेर? कारणही गंभीर


Next Post
Cheteshwar-Pujara

चुकलास राव! 100व्या कसोटीत पुजारा शून्यावर बाद, लायनविरुद्ध खेळताना नकोशा विक्रमात बनला टॉपर

Rishabh-Pant

टीम इंडियाला खरंच भासतेय रिषभ पंतची गरज! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 'या' विक्रमात टॉपर आहे पठ्ठ्या

KL-Rahul

आता बास झालं! फ्लॉप शोमुळे राहुल होणार कसोटी संघातून बाहेर? शेवटच्या 9 डावातील कामगिरी लज्जास्पद

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143