न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या न्यूझीलंड क्रिकेटच्या राष्ट्रीय करारातून त्याला वगळण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्याने स्वतः आपल्याला या करारातून बाहेर करण्याची विनंती केली होती. व्यावसायिक टी20 लीग खेळण्यासाठी व कुटुंबाला वेळ देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतलेला. मात्र, आता तो पुन्हा एकदा राष्ट्रीय संघात दिसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
बोल्टने न्यूझीलंड संघासाठी टी20 विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र, असे असले तरी न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड त्याला यावर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकात संधी देऊ इच्छितो. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवडकर्ता गाविन लार्सन यांनी म्हटले,
“तो आमचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे या वर्षाच्या शेवटी होत असलेल्या विश्वचषकात तो संघात असावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड हे सातत्याने त्याच्याशी चर्चा करत आहेत. आम्हाला आशा आहे की याबाबत सकारात्मक निर्णय होईल. तो विश्वचषकात आमच्यासाठी गोलंदाजी करताना पाहायला आम्हाला आवडेल.”
बोल्ट न्यूझीलंड संघाच्या सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल ५४८ विकेट्सची नोंद आहे. 78 कसोटी सामने खेळताना त्याने 317 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये 99 सामन्यात 187 विकेट्स आणि 55 टी20 सामन्यांमध्ये 74 विकेट्स घेतल्या आहेत. पुढील विश्वचषक भारतात होणार आहे. बोल्ट हा मागील अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. भारतात खेळण्याचा पुरेसा अनुभव असल्याने बोर्ड देखील त्याला संघात स्थान देण्याची दाट शक्यता आहे.
(Newzealand Chief Selector Hopefull For Trent Boult Play In 2023 ODI World Cup In India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता डोळ्यांना ताण देण्याची गरज नाही! बीसीसीआयने जिओला दिली मंजुरी, 4K व्हिडिओत दिसणार आयपीएल सामने
‘या यशाचे श्रेय वडिलांचे’, अहमदाबादमधील शतकानंतर शुबमनची कृतज्ञ कबुली