मयंती लँगर एक लोकप्रिय निवेदिका आहे. सध्या तिने खेळ जगतापासून काही काळ अंतर ठेवले आहे. असे असले तरी क्रिकेट तिच्यापासून दूर जाण्यास तयार नाही. याचा पुरावा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून सापडला आहे. तिच्या पोस्टमुळे भारतीय क्रिकेट जगतात चर्चा सुरु झाली आहे. मयंतीने तिचा पती स्टुअर्ट बिन्नीचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे, ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे.
मयंतीने भारताच्या 2014 च्या इंग्लंड दौऱ्यातील एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला, ज्यात तिचा पती स्टुअर्ट बिन्नीने कसोटी पदार्पणात शानदार खेळी केली होती. मयंतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा पती स्टुअर्ट बिन्नी धावताना दिसत आहे, तर इंग्लंडचा आघाडीचा गोलंदाज जेम्स अँडरसन निराश झालेला दिसत आहे.
मात्र, मयंतीने या फोटोसह कोणतेही कॅप्शन लिहिले नाही, त्यामुळे या फोटोवर बरीच चर्चा झाली आहे. अनेकांचा असे वाटत आहे की, मयंतीने भारतीय संघाला स्टुअर्ट बिन्नीसारख्या अष्टपैलू खेळाडूला पुढील कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्याचा सल्ला दिला आहे.
वेगवान गोलंदाज जर चांगला फलंदाज असेल, तर असे अष्टपैलू खेळाडू फलंदाजीमध्ये अजून खोली आणतो आणि संघाची समस्या सोडवण्यास मदत करतो. त्याचवेळी, काही चाहते असेही म्हणत आहेत की, मयंतीने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून हेडिंग्ले कसोटीच्या पराभवानंतर भारतीय संघाला टोमणे मारले आहेत.
बिन्नीने 2014 च्या नॉटिंगहॅम कसोटीत पदार्पण केले होते, कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 78 धावा केल्या होत्या आणि हेडिंग्लेच्या पहिल्या डावात भारत 78 धावांवरच बाद झाला. काहींना असेही वाटते की या खेळीचा संदर्भ देऊन तिने भारतीय संघास तिरकस शेरा मारला आहे.
आता मयंती लँगरने फोटोसह कोणतेही कॅप्शन लिहिलेले नसल्याने तिने भारतीय संघाला टोमणे मारले आहेत की नाही याचा अंदाज लावणे कठीण आहे. किंतु, या क्रीडा निवेदिकेने तिच्या पतीची सर्वोत्तम कसोटी खेळी आठवणारा फोटो शेअर केला आहे.
मयंती लँगरने गेल्या वर्षी तिच्या कारकिर्दीतून काही काळ विश्रांती घेतली होती. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. ती सध्या तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. गेल्या वर्षी, मयंती लँगरने चाहत्यांना सांगितले होते की तिचे आता आयुष्य खूप बदलले आहे. मयंती लँगर म्हणाली होती, ‘जर आयपीएल 2020 वेळेवर झाली असती तर मी माझे काम सुरू ठेवले असते.’ पण मी आणि स्टुअर्ट आता मुलाच्या सानिध्यात वेळ घालवत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली खेळणार का? श्रेयस अय्यरने दिले ‘असे’ उत्तर
अबुधाबीतील मोठी स्पर्धा गाजवताना दिसणार डू प्लेसिस; ‘या’ संघाचा बनला आयकॉन आणि कर्णधार
गावसकरांनी चौथ्या कसोटीच अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा दिल्ला सल्ला, पण विराट म्हणाला…