पॅरीस सेंट-जर्मेनच्या कायलिन एमबाप्पेने लीग 1 मध्ये 13 मिनिटामध्ये 4 गोल करत या लीगचा 45 वर्षांचा विक्रम मोडला. या सामन्यात जर्मेनने ऑलिंपिक लायनवर 5-0 असा विजय मिळवला.
रशियात झालेल्या फिफा विश्वचषकाच्या बेस्ट यंग प्लेयरचा पुरस्कार मिळवणाऱ्या फ्रान्सच्या या फुटबॉलपटूने या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात ही कामगिरी केली. तसेच या लीगचे पहिले नऊ सामने जिंकणारा जर्मेन हा पहिलाच संघ आहे.
Un record historique après un match héroïque 📈
🔴🔵 #ICICESTPARIS pic.twitter.com/EdJZH0RhOL
— Paris Saint-Germain (@PSG_inside) October 7, 2018
पहिल्या सत्रात एमबाप्पेने संथ गतीने खेळत दुसऱ्या सत्रात उत्कृष्ठ खेळ केला. या लीगच्या मागील 45 हंगामात एकाच सामन्यात चार गोल करणारा 19 वर्षीय एमबाप्पे हा सर्वाधिक कमी वयाचा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याने 61, 66, 69 आणि 74 व्या मिनिटाला हे गोल केले.
या सामन्यात जर्मेनकडून नेमारने 9व्या मिनिटाला गोल करत सामन्याला चांगली सुरूवात करून दिली.
पहिल्या सत्रात लायनने चांगलाच प्रतिकार केला. लायनच्या टॅंगी एनडोमबेलेला विचित्र पद्धतीने टॅकल केल्याने जर्मेनच्या प्रेसनल किमपेमबेला 32व्या मिनिटाला रेड कार्ड मिळाल्यावर सामन्याला वेगळेच वळण मिळाले होते.
या विजयामुळे जर्मेन संघाचे या लीगचे सलग दुसरे विजेतेपद निश्चित झाले आहे. तसेच हा संघ या लीगमध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून त्यांनी एकूण 32 गोल केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–फिट राहण्यासाठी विराट कोहली वेगन या अनोख्या जीवन पद्धतीचा करतोय अवलंब
–१०० पेक्षा जास्त सामने खेळलेल्या दोन खेळाडूंना भारताविरुद्धच्या मालिकेतून डच्चू