टोकियो ऑलिंपक २०२० चा तिसरा दिवस (२५ जुलै) भारतासाठी आनंदाचा ठरताना दिसत आहे. भारताची सहा वेळची जागतिक चॅम्पियन एमसी मेरी कोमने ५१ किलो वजनी गटातील राऊंड ३२ च्या सामन्यात डॉमिनिकन रिपब्लिकच्या मिगुएलिना हर्नांडिज गार्सियाला सहजरीत्या ४-१ ने पराभूत केले.
विशेष म्हणजे २०१२ ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या ३८ वर्षीय मेरीने पहिल्याच सामन्यात आपल्यापेक्षा १५ वर्षे लहान आणि पॅन अमेरिकन गेम्समध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या मिगुएलिनाला धूळ चारली आहे. (MC Mary Kom Enters Pre-quarters, Beats Opponent Who is 15 Years Younger )
Good news from Boxing folks:
Star Indian pugilist Mary Kom moves into Pre-QF (51kg) with hard-fought win (split verdict decision) over Dominican Republic boxer in 1st round. #Tokyo2020withIndia_AllSports pic.twitter.com/ZVBRpga4k7— India_AllSports (@India_AllSports) July 25, 2021
सुपरमॉम मेरी कोम
मेरी कोम दुसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये भाग घेत आहे. लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्य पदकावर आपले नाव कोरणारी मेरी ३ मुलांची आई आहे. मेरी टोकियोमध्ये ५१ किलो वजनी गटात भाग घेत आहे. मणिपूरची मेरी टोकियो ऑलिंपिकमध्ये उद्घाटन समारंभात भारतीय गटाची ध्वजवाहक होती.
तिने मार्च २०२० मध्ये आशिया/ओसनिया उपांत्य फेरीत पोहोचण्यासोबतच टोकियो ऑलिंपिकमध्ये खेळण्याची पात्रताही मिळवली होती. कदाचित मेरीची ही शेवटची ऑलिंपिक असू शकते.
मेरी कोम आता उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचली असून तिचा पुढील सामना २९ जुलैला कोलंबियाची पदक विजेती इंग्रीट वलेन्सीयाशी होईल. इंग्रीटने २०१६ साली रियो गेम्समध्ये कांस्य पदकावर आपले नाव कोरले होते.