---Advertisement---

केव्हा, कुठे आणि कसा पाहाल श्रीलंका विरुद्ध भारत संघातील पहिला टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही

On: रविवार, जुलै 25, 2021 3:46 PM
---Advertisement---

कोलंबो| भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात नुकतीच वनडे मालिका पार पडली आहे. यानंतर श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेचा थरार रंगणार आहे. रविवार रोजी (२५ जुलै) या मालिकेतील पहिला सामना होणार आहे; तर गुरुवार रोजी (२९ जुलै) तिसरा आणि अंतिम टी२० सामना खेळला जाणार आहे.

वनडे मालिका विजयानंतर शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ विजयी लय कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल. तर श्रीलंकेचा संघ मागील मालिकेतील चूका सुधारत टी२० मालिका विजयाच्या लक्ष्याने मैदानावर उतरेल. अशात दोन्हीही संघ पहिला टी२० सामना विजयासह टी२० मालिकेचा शुभारंभ करण्यासाठी झगडताना दिसतील.

आमने-सामने कामगिरी
श्रीलंका आणि भारत संघ आतापर्यंत १९ टी२० सामन्यात एकमेकांशी भिडले आहेत. त्यातील १३ टी२० सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर श्रीलंकेने ५ टी२० सामन्यात विजयी पताका झळकावली आहे. उरलेला १ टी२० सामना अनिर्णीत राहिला आहे.

कधी होणार आहे पहिला टी२० सामना ?
श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला टी२० सामना रविवारी अर्थात २५ जुलै रोजी होणार आहे.
कुठे होणार पहिला टी२० सामना ?
श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील पहिली टी२० सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.
किती वाजता होणार पहिला टी२० सामना ?
श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. तत्पुर्वी ७.३० वाजता नाणेफेक होईल.

पहिल्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या टिव्ही चॅनेलवर पाहाता येईल ?
श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

पहिल्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या वनडे सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण Sony Liv या ऍपवर पाहाता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ 

भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.

श्रीलंका संघ – दसून शनका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्ष, पथम निसान्का, चरिथ असलांका, वनिंदू हसरंगा, अशेन बंदरा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुशमंथा चमीरा, लक्षण संदकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्ष्मण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रम, असिता फर्नांडो, कसून रजीता, लाहिरू कुमारा, इसुरु उडाना.

महत्त्वाच्या बातम्या-

एकच लक्ष्य, पुनरागमन फक्त; कसोटी संघातून बाहेर असलेला उमेश ट्रेनिंगदरम्यान गाळतोय घाम

धोनी नव्हे तर ‘हा’ दिग्गज होता भारतीय टी२० संघाचा पहिला कर्णधार, धवन असेल केवळ सातवा 

इशारे तेरे..! भारताचा धुरंधर इशान किशनचे डोळ्यांचे इशारे पाहिले का? करतील तुम्हालाही घायाळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---