---Advertisement---

इशारे तेरे..! भारताचा धुरंधर इशान किशनचे डोळ्यांचे इशारे पाहिले का? करतील तुम्हालाही घायाळ

On: रविवार, जुलै 25, 2021 1:25 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका संघात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला आहे. भारतीय संघाकडून श्रीलंका संघाला क्लीन स्वीप करायची पुरेपूर संधी होती. पण भारतीय संघाला यात यश मिळाले नाही. तिसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघाला ३ विकेटने हरवले होते. या सामन्यातून ५ भारतीय खेळाडूंनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु हा बदल भारतीय संघाला खूप महागात पडला आणि भारतीय संघाने हा शेवटचा सामना गमावला.

परंतु याच दरम्यान असे काही घडले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण सामना सुरू असताना याच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नव्हते.

ईशान किशनचा व्हिडिओ व्हायरल
श्रीलंका संघाविरुद्ध खेळण्यात आलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नवीन खेळाडूंनी आगमन केले होते. त्यामुळे ईशान किशनला विश्रांती दिली गेली होती. असे असूनही ईशानबद्दल चर्चा सुरू झाली आहे. त्याचे झाले असे की, सामन्यादरम्यान ईशान मजेशीर अंदाजात डोळा मारताना कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

ईशानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर चाहते देखील या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. या अगोदर असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ भारताची क्रश बनलेली प्रिया प्रकाशचा होता. तिचा डोळा मारतानाचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. आता ईशान किशनचा हा व्हिडिओ प्रिया प्रकाशच्या व्हिडिओपेक्षाही जास्त लोकांना आवडत आहे.

शेवटच्या सामन्यात भारताचा पराभव
शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा संघाचा निर्णय चुकीचा ठरला. या सामन्यात ४३ षटकात अवघ्या २२५ धावात भारताचे सर्व खेळाडूंना बाद झाले होते. संघाकडून उत्कृष्ट प्रदर्शन करत पृथ्वी शॉने ४९ धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त संजू सॅमसनने ४६ तर सूर्यकुमार यादवने ४० धावा केल्या होत्या. तर श्रीलंका संघाकडून अकिला धनंजय आणि प्रवीण जयविक्रमाने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

भारतीय दिलेल्या २२५ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने ७ गडी गमावत या धावसंख्येचा पाठलाग केला. श्रीलंकेकडून त्याची सलामीवीर अविष्का फर्नांडोने सर्वाधिक ७६ धावा केल्या होत्या. याशिवाय भानुका राजपक्षेने ६५ धावा केल्या. भारताकडून राहुल चहर आणि चेतन सकारिया यांनी अनुक्रमे ३ आणि २ गडी बाद केले होता.

या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. तर आता भारतीय संघाला २५ जुलैपासून टी २० सामन्यांची मालिका सुरू होणार आहे

महत्त्वाच्या बातम्या-

गोड बातमी! नव्या वर्षाचा आनंद होणार द्विगुणित, भारताच्या ‘या’ त्रिशतकवीराच्या घरी हालणार पाळणार

शास्त्रींच्या ‘राइट हँड’चे भारतीय संघात पुनरागमन, प्रशिक्षकाने ‘असे’ केले आपल्या मित्राचे स्वागत

अतिशय दुर्देवी! ‘द वॉल’ द्रविडच्या वनडेतील ‘त्या’ ४ सर्वोत्तम खेळ्या, ज्यांना मिळाले नाही काडीचंही महत्त्व

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---