भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत क्रिकेट संघटना म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनचा (एमसीए) उल्लेख केला जातो. नुकतेच एमसीएने आपल्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण केले. या पुरस्कारांवर अनेक युवा खेळाडूंनी छाप सोडली. त्याचवेळी या पुरस्कार सोहळ्यात 2021 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील गाबा कसोटीत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य असलेल्या मुंबईच्या खेळाडू व प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
भारतीय संघाने 2020-2021 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली होती. ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या अखेरच्या सामन्यात अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 328 धावांची गरज होती. 32 वर्षांपासून ऑस्ट्रेलिया संघ या मैदानावर अपराजित होता. मात्र, शुबमन गिल (91), चेतेश्वर पुजारा (56) व रिषभ पंत (नाबाद 89) यांनी शानदार फलंदाजी करत तीन षटके शिल्लक असताना भारताला विजय मिळवून दिला. यासह संघाने मालिका देखील आपल्या खिशात घातली. या संघाचे नेतृत्व मुंबईचा अजिंक्य रहाणे हा करत होता. तर, अष्टपैलू शार्दुल ठाकूर संघाचा महत्त्वाचा खेळाडू ठरलेला. याव्यतिरिक्त त्यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून मुंबईचे असलेले रवी शास्त्री हे काम पाहत होते.
या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार व शिल्पकार म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी (6 जानेवारी) झालेल्या आपल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये या तिघांना सन्मानित केले. या पुरस्कार सोहळ्यात पृथ्वी शॉ, धवल कुलकर्णी व सर्फराज खान यांनी वर्चस्व गाजवले. शॉने 9, सर्फराजने 8 तर धवलने 7 पुरस्कार आपल्या नावे केले. बीकेसी हॉल येथे पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यास मुंबई क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावलेली.
(MCA Honoured Gabba Winners Rahane Shardul And Shastri)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
40 वर्षापासून श्रीलंका भारतात फेल! सूर्य खेळीने विजय साकार, भारताच्या यशाचे काही बलाढ्य रेकॉर्ड्स
आयपीएल न खेळता पंत मालामाल! बीसीसीआय मोजणार 21 कोटींची रक्कम