मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष विजय पाटील (Vijay Patil) यांनी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) याचं कौतुक करताना म्हणाले की, संग्रहालयासाठी १० विकेट्स घेतलेला चेंडू दान केल्यामुळे तो चेंडू संग्रहालयाचा गौरव बनला आहे. पाटील म्हणाले, “एजाज पटेलने वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) घेतलेल्या १० विकेट्स ही उल्लेखनीय कामगिरी आहे. हा पराक्रम त्याने आमच्या प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर केला ही वस्तुस्थिती आहे. यामुळे या ऐतिहासिक स्टेडियमच्या आठवणीत अजून भर पडली.” मुंबईमध्ये जन्मलेल्या ३४ वर्षीय डावखुऱ्या फिरकीपटूने डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या भारत विरुध्द न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी (India vs Newzealand 2nd Test) सामन्यात पहिल्या डावात सर्व १० विकेट्स घेतल्या. तो जिम लेकर (Jim Laker) (१९५६) आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) (१९९९) नंतर हा पराक्रम करणारा जगातला तिसरा गोलंदाज बनला.
पाटील म्हणाले, “तो मुंबईशी जोडला गेला असल्याने हा पराक्रम अजूनच विशेष बनतो. त्याने सिद्ध केलं की तो उदार मनाचा आहे. हा पराक्रम करूनही त्याने उदारता दाखवत १० विकेट्स घेतल्या तो चेंडू आम्हाला दिला. याला आम्ही खूप महत्त्व देतो आणि हा आमच्या एमसीए (MCA) संग्रहालयाचा गौरव आहे.” पाटील म्हणाले, हे संग्रहालय तरुणांना प्रेरित करेल.
ते पुढे म्हणाले, “मला असं वाटतं की हे संग्रहालय स्थापित करणे एक उत्तम उपाय आहे. कारण मुंबई क्रिकेटचा वारसा तेवढा मोठा आहे. आमचे जवळपास ८० खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळले आहेत आणि भारतीय फलंदाजांनी केलेल्या धावांचा पाचवा हिस्सा मुंबईच्या खेळाडूंचा आहे. आमचं हे वारसा राखण्याचं पाऊल आताचे आणि भविष्यात होणाऱ्या क्रिकेटर्सला प्रेरित करेल.” भारताने वानखेडे स्टेडियमवरच २०११ चा वनडे विश्वचषक जिंकला होता. पाटील म्हणाले, “तो क्षण खूप खास होता, २०११ चा विश्वचषक (2011 Cricket World Cup) नक्कीच भारतीय क्रिकेटसाठी विशेष क्षण होता. हा विश्वचषक सुध्दा आपण वानखेडे स्टेडियमवरच जिंकलो त्यामुळे त्या आठवणी आम्ही मनात साठवून ठेवल्या आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/ravichandran-ashwin-names-current-favourite-pakistan-player/
https://mahasports.in/senior-national-hockey-maharashtra-enters-in-semifinals/