क्रिकेट असा खेळ आहे, ज्यात काळानुसार अनेक बदल करण्यात आले. क्रिकेटमध्ये नियम करण्यासाठी मेरिलबोन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसी (MCC) आहे. एमसीसीच्या सुचनांनुसारच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून नियम लागू होत असतात. नुकतेच एमसीसीने पुन्हा एकदा अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू होणार आहेत. म्हणजेच यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup) बदलेल्या नियमांसह खेळला जाणार आहे.
एमसीसीने 2017 साली लागू झालेल्या काही नियमांमध्येही (Laws of Cricket) बदल केले आहेत. हे बदलेले नियम लागू होण्यापूर्वी मधल्या काळात एमसीसी जागतिक स्तरावरील पंच आणि अधिकृत प्रशिक्षणासाठी मदत करण्यासाठी संबंधित साहित्य अद्ययावत करेल.
1. बदली खेळाडू
कलम 1.3 मध्ये नवीन नियम करण्यात आला आहे. यानुसार बदली खेळाडूला तशीच वागणूक दिली जाईल, जशी मुख्य खेळाडूला होती, ज्याच्याऐवजी तो मैदानात आला आहे, मग ती त्या सामन्यात खेळाडूवर घातलेले निर्बंध असो किंवा बाद करणे असो.
2. नवा फलंदाज येणार स्ट्रायकर एन्डला
कलम 18.11 मध्ये आता बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार जेव्हा एखादा फलंदाज झेलबाद होईल, तेव्हा नवा खेळाडू स्ट्राईक घेईल आणि पुढच्या चेंडूचा सामना करेल (जोपर्यंत एक षटकाचा शेवट होत नाही). हा बदल यापूर्वी पहिल्यांदा इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून द हंड्रेड लीग स्पर्धेत अजमावून पाहण्यात आला होता.
3. डेड बॉल (कलम 20.4.2.12)
डेड बॉलबाबतही एमसीसीने बदल सुचवला आहे. सामन्यादरम्यान मैदानात कोणत्याही व्यक्ती, प्राणी किंवा अन्य वस्तूंमुळे कोणत्याही संघाचे नुकसान होत असेल, तर तो डेड बॉल दिला जाईल. मग खेळपट्टीवर आक्रमण करणाऱ्यापासून मैदानावर पळणाऱ्या कुत्र्यांपर्यंत, मैदानात हस्तक्षेप होत असतो. त्याचा परिणाम जर खेळावर होत असेल, तर पंच डेड बॉलचा संकेत देतील.
4. गोलंदाजाकडून धावबादचा प्रयत्न (कलम 21.4)
जर कोणता गोलंदाज चेंडू टाकण्याच्या ऍक्शनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी (डेलिव्हरी स्ट्राईडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी) स्ट्रायकर एन्डवरील फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो आता डेड बॉल दिला जाईल, याआधी त्याला नो बॉल करार दिला जायचा. अशी घटना क्रिकेटमध्ये फार दुर्मिळ आहे.
5. वाईड बॉल (कलम 22.1)
सध्याच्या काळात गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी फलंदाज क्रिजच्या चारही बाजूंना फिरतात. त्यामुळे गोलंदाजाने त्याच्या/तिच्या डिलिव्हरी स्ट्राईडमध्ये प्रवेश केल्यावर चेंडू फलंदाज उभा असलेल्या जागेच्या जवळून गेला, तर त्याला वाईड देणे, हे आयोग्य वाटत आहे. त्याचमुळे आता गोलंदाजाने रनअप सुरू केल्यापासून फलंदाज जिथे उभा असेल, तिथून वाईड लागू होईल, मग फलंदाज कुठेही उभा असेल. ते जरी सामान्य फलंदाजी करण्याचे स्थान असेल, तरी वाईड दिला जाऊ शकतो.
6. स्ट्राईकरवरील फलंदाजाला चेंडू खेळण्याचा अधिकार (कलम 25.8)
नवीन 25.8 कलमनुसार जर चेंडू खेळपट्टीच्या दूर पडला, तर स्ट्रायकर एन्डवरील फलंदाजाला तो चेंडू खेळण्याची परवानगी असेल, जोपर्यंत त्याच्या बॅटचा किंवा त्या फलंदाजाचा काही भाग खेळपट्टीच्या आत असेल. पण जर फलंदाज खेळपट्टीच्या पूर्ण बाहेर गेला, तर पंच कॉल घेतील आणि डेड बॉलचा संकेत देतील. तसेच फलंदाजाला परतफेड म्हणून, जो चेंडू फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडेल, त्या चेंडूला नो बॉल दिला जाईल.
7. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून चूकीची वागणूक (कलम 27.4 आणि 28.6)
जेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून कोणताही खेळाडू चूकीची गोष्ट करत असेल, तर त्याला केवळ डेड बॉल घोषित केला जायचा, मग जरी फलंदाजाने एखादा चांगला फटकाही खेळला असला तरी. त्यामुळे जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कोणत्याही सदस्याने अनुचिक किंवा मुद्दाम एखादी गोष्ट केली, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 पेनल्टी धावा दिल्या जातील
8. मंकडींग आता धावबाद म्हणूनच ओळखला जाईल (कलम 38.3)
नॉन स्ट्रायकरला धावबाद करणे आत्तापर्यंत अयोग्य किंवा खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचे मानले जायचे, पण आता हा नियम कलम 38 मध्ये हलवण्यात आला असून तो धावबाद म्हणूनच ओळखला जाईल. अशा प्रकारचे धावबाद करणे खिलाडूवृत्तीच्या विरोधात नसेल.
9. चेंडूवर लाळ लावण्याच बंदी (कलम 41.3)
कोविड-19 मुळे चेंडूवर लाळ लावण्यास परवानगी नव्हती. हा नियम यापुढेही लागू राहणार आहे. कारण एमसीसीच्या म्हणण्यानुसार गोलंदाज लाळेऐवजी त्यांच्या घामाचा उपयोग करूनही चेंडूला स्विंग मिळवत होते. त्यामुळे लाळेचा उपयोग न झाल्याने त्याचा फारसा परिणाम पाहायला मिळालेला नाही. त्याचमुळे यापुढेही लाळेचा उपयोग करण्याच बंदी असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
वाॅर्नचे खांदे कसे बनले मजबूत?, अश्विनने सांगितली द्रविडकडून ऐकलेली बालपणीची कहाणी
वेस्ट इंडिजच्या क्रिकेटरचा हवेत सूर मारत एकहाती झेल, विश्वचषकातील ठरला सर्वोत्तम कॅच!
वेस्ट इंडिजने ७ धावांनी इंग्लंडचा उडवला धुव्वा, नोंदवला विश्वचषकातील सलग दुसरा विजय