दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवार रोजी (०४ एप्रिल) झालेला दुसरा वनडे सामना यजमान संघाने १७ धावांनी जिंकला. या रोमहर्षक सामन्यात अखेर बाजी मारत दक्षिण आफ्रिकाने वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. परंतु या सामन्यापेक्षा जास्त पाकिस्तानी सलामीवीर फखर जमान याच्या विकेटची अधिक चर्चा रंगली. दक्षिण आफ्रिकाचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक याने फेक फिल्डींग करत त्याला द्विशतकाच्या तोंडावर बाद केले.
यानंतर खरे तर, पंचांनी फखरला नाबाद घोषित करायला हवे होते. पाकिस्तान संघाला त्या चेंडूवर जास्तीच्या ५ धावा मिळायल्या हव्या होत्या. जेणेकरुन प्रतिस्पर्धी संघाला त्यांचा कृतीचा दंडही मिळेल. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. मात्र मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) त्यांनी नियमांचे स्पष्टीकरण देत फखरला बाद करार करण्याचा निर्णय का योग्य होता? हे सांगितले आहे.
एमसीसीने ट्विट करत सांगितले आहे की, ‘४१.५.१ नियम असे सांगतो की, एखादा क्षेत्ररक्षक चेंडू पकडल्यानंतर मुद्दाम आपल्या कृतीने किंवा शब्दांनी फलंदाजाला धाव घेताना समस्या निर्माण करत असल्यास ही बाब चुकीची आहे. म्हणजे क्षेत्ररक्षकाने फलंदाजाला मुद्दाम भ्रमित केले असल्यास योग्य तो निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार पंचांना असतो. मात्र पंचांनी फखर जमानला बाद घोषित केले. अर्थात स्पष्ट आहे की, पंचांना क्विंटन डीकॉकचे कृत्य मुद्दाम असल्याचे वाटले नाही.’
‘जर वास्तवात असे झाले असते, तर दक्षिण आफ्रिका संघाला दंड म्हणून अधिकच्या ५ धावा दिल्या गेल्या असत्या. याबरोबरच विरोधी संघातील कोणता फलंदाज पुढे स्ट्राईकवर असेल हेदेखील त्यांना ठरवावे लागले असते,’ असे त्यांनी पुढे लिहिले.
https://twitter.com/MCCOfficial/status/1378788275373146113?s=20
The Law is clear, with the offence being an ATTEMPT to deceive, rather than the batsman actually being deceived.
It’s up to the umpires to decide if there was such an attempt. If so, then it's Not out, 5 Penalty runs + the 2 they ran, and batsmen choose who faces next ball.
— Marylebone Cricket Club (@MCCOfficial) April 4, 2021
क्विंटन डी कॉकच्या चपळतेने फखर जमान धावबाद
दक्षिण आफ्रिकाचा गोलंदाज लुंगी एन्गिडीने सामन्याच्या शेवटच्या षटकात टाकलेल्या चेंडूवर फखरने फटका मारला. त्यानंतर तो आणि त्याच्याबरोबर फलंदाजीला असलेल्या हॅरीस रॉफने धावा मिळवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी पहिली धाव यशस्वी पार केली. मात्र दुसरी धाव घेत असताना दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक एडेन मार्करमने यष्टीरक्षक उभ्या असलेल्या दिशेने चेंडू फेकला आणि तो चेंडू थेट स्टंपला लागला. त्यावेळी फखर क्रिजमध्ये परतलेला नव्हता, त्यामुळे त्याला बाद होऊन परतावे लागले.
यावेळी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटॉन डीकॉकची चपळता कामी आली. कारण त्याने अशी कृती केली की फलंदाजाला असे वाटेल की क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या बाजूला चेंडू फेकणार आहे. ज्यामुळे फखरने मागे वळून पाहिले आणि त्याला क्रिजमध्ये येण्यास काही सेंकद उशीर झाला आणि तो धावबाद झाला. तसेच अवघ्या ७ धावांनी द्विशतकाची संधीही हुकली.
असे असले तरीही, फखर १५५ चेंडूत १९३ धावांची खेळी करत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या खेळीसाठी त्याने १० षटकार आणि १८ चौकार मारले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
फेक फिल्डिंगने हुकवलं फखर जमानचं द्विशतक, पाकिस्तानी दिग्गजाने क्विंटन डीकॉकला सुनावली खरीखोटी
IPL: विराटशी झालेल्या वादानंतर पंचांनी तोडला होता खोलीचा दरवाजा, द्यावे लागले होते ‘इतके’ रुपये
वेगवान गोलंदाजाने आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणं सोप्पं नाही, या दिग्गजांनी केलाय तो पराक्रम






