---Advertisement---

IPL: विराटशी झालेल्या वादानंतर पंचांनी तोडला होता खोलीचा दरवाजा, द्यावे लागले होते ‘इतके’ रुपये

On: सोमवार, एप्रिल 5, 2021 10:16 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा आणि आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली याचा स्वभाव सर्वांना परिचित आहे. त्याला बऱ्याचदा मैदानावर भावना अनावर झाल्याचे आपण पाहिले आहे. रागाच्या भरात विरोधी संघाच्या खेळाडूंशी शाब्दिक बाचाबाची करणे, बॅट किंवा बॉल मैदानावर आदळणे एवढेच नव्हे तर बऱ्याचदा पंचांशी वाद घालतानाही तो दिसला आहे.

असाच एक प्रसंग घडला होता, जेव्हा एका सामन्यातील विराट आणि पंचात झालेल्या तिखट वादानंतर पंचांनी खोलीचा दरवाजा तोडला होता.

तर झाले होते असे की, आयपीएल २०१९ मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एक सामना झाला होता. या सामन्यादरम्यान विराट आणि पंच नाइजल लॉन्ज यांच्याच वाद झाला होता. पंच नाइजल यांनी बेंगलोरचा गोलंदाज उमेशचा एक चेंडू नॉ बॉल करार केला होता. यामुळे कर्णधार विराटने पंचांना त्यांच्या निर्णयाबद्दल विचारल्याने हा वाद सुरू झाला होता.

टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, मैदानावरील या वादाने संतापून डाव संपल्यानंतर पंच नाइजल यांनी आपल्या खोलीच्या दरवाजाला जोराची लाथ मारली होती. यामुळे तो दरवाजा अक्षरश: तुटला होता. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला याची माहिती कळताच त्यांनी पंच नाइजल यांच्याकडे त्यांच्या कृतीचे स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर पंच नाइजल यांनी संबंधित अधिकाऱ्यांची क्षमा मागितली होती आणि भरपाई म्हणून ५ हजार रुपयेही दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

पाँटिंगचा खळबळजनक खुलासा, ‘शॉने त्यावेळी माझ्या डोळ्यात पाहात नेटमध्ये सराव करण्यास नकार दिला होता’

केकेआरचा धाकड फलंदाज शुबमन गोलंदाजीतही होता माहीर, ‘त्या’ घटनेनंतर सोडली बॉलिंग

कोण असेल धोनीचा उत्तराधिकारी आणि कोण घेणार हेजलवुडची जागा? ऐका सीएसके सीईओच्या तोंडून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---