इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. कारण त्याने काहीदिवसांपूर्वी झालेल्या विजय हजारे वनडे ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्लीला त्याच्याकडून अशाच चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अशातच दिल्ली कॅपिटल्स मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने शॉबद्दल मोठे भाष्य केले आहे.
शॉ मागील आयपीएल हंगामात धावा करण्यात संघर्ष करत होता. त्यावेळी त्याने नेट्समध्ये सराव करण्यास नकार दिला होता, असा खुलासा पाँटिंगने केला आहे. पाँटिंगने मागीवर्षीही दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक होता.
पाँटिंगने क्रिकेट.कॉम.एयूशी बोलताना सांगितले की ‘मागीलवर्षी शॉचा त्याच्या फलंदाजीबद्दल अनोखा सिद्धांत होता. जेव्हा त्याच्या धावा होत नव्हत्या, तेव्हा त्याला फलंदाजी करायची नव्हती आणि जेव्हा त्याच्या धावा होत होत्या तेव्हा त्याला नेहमीच फलंदाजी करायची असायची.’
पाँटिंग पुढे म्हणाला, ‘त्याने चार-पाच सामन्यांत १० पेक्षाही कमी धावा केल्या होत्या. तेव्हा मी त्याला म्हटलो होतो की आपण नेट्समध्ये जाऊन समस्या दूर करायला हवी. त्यावेळी त्याने माझ्या डोळ्यात पाहात म्हटले होते की नाही तो फलंदाजी करणार नाही. मला ही गोष्ट अजिबातच समजली नाही.’
तसेच तो म्हणाला, ‘शॉ कदाचीत बदलला असेल. मला माहित आहे मागील काही महिन्यांत त्याने स्वत:वर खुप काम केले आहे. कदाचीत त्याचा सिद्धांत बदलला असेल. आशा आहे की असे झाल असेल कारण त्याच्याकडून आम्ही सर्वोत्तम कामगिरी करुन घेऊ शकलो तर तो एक चांगला खेळाडू बनू शकतो.’
याबरोबरच पाँटिंगने असेही सांगितले की त्याने शॉला सातत्याने सल्ला दिला होता. मात्र, शॉ त्याच्या बोलण्यावर ठाम होता. तसेच पाँटिंगने असाही विश्वास व्यक्त केला आहे की शॉ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी प्रदर्शन करेल.
पाँटिंग म्हणाला, ‘कदाचीत त्याने त्याच्या सरावाच्या सवयी बदलल्या असतील. कारण फक्त दिल्ली कॅपिटल्ससाठीच नाही तर मला विश्वास आहे की तो भविष्यात भारतीय संघासाठीही खूप क्रिकेट खेळताना दिसेल.’
त्याचबरोबर पाँटिंगने असेही सांगितले की शॉ मध्ये आणि सचिन तेंडुलकरमध्य अनेक गोष्टींच समानता आहेत, जसे ते दोघेही फिरकी गोलंदाजी चांगले खेळतात.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरचा धाकड फलंदाज शुबमन गोलंदाजीतही होता माहीर, ‘त्या’ घटनेनंतर सोडली बॉलिंग
कोण असेल धोनीचा उत्तराधिकारी आणि कोण घेणार हेजलवुडची जागा? ऐका सीएसके सीईओच्या तोंडून
साता समुद्रापार असूनही आर्चरचे आयपीएलवरचे प्रेम काही कमी होईना; शेअर केला ‘हा’ खास फोटो