---Advertisement---

साता समुद्रापार असूनही आर्चरचे आयपीएलवरचे प्रेम काही कमी होईना; शेअर केला ‘हा’ खास फोटो

On: सोमवार, एप्रिल 5, 2021 7:37 PM
Jofra Archer
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी२० मालिकेनंतर जोफ्रा आर्चरने वनडे मालिकेतून दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे आगामी आयपीएल स्पर्धेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेचे १४ वे हंगाम सुरू होणार आहे. अशातच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचे आयपीएलवरचे प्रेम दिसून येत आहे.

आयपीएल स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच राजस्थान रॉयल्स संघाने देखील सरावाला सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा पहिला सामना १२ एप्रिल रोजी पंजाब किंग्ज संघासोबत होणार आहे. युवा संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच खेळणाऱ्या या संघाला जोफ्रा आर्चरची कमतरता जाणवू शकते.

तसेच सात समुद्रपार पार असलेल्या जोफ्रा आर्चरला देखील आयपीएल खेळण्याची इच्छा होत आहे, असे दिसून येत आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो टीव्हीवर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचा आयपीएल २०२० मध्ये पार पडलेला सामना पाहत आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने २०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. यासोबतच आर्चरने देखील ताबडतोड फलंदाजी केली होती.

Screengrab: Instagram/Jofra Archer

भारतीय संघाविरुद्ध वनडे मालिका खेळल्यानंतर आर्चर राजस्थान रॉयल्स संघाला जोडला जाणार होता. परंतु, त्याची दुखापत गंभीर होत चालली होती. त्यामुळे त्याला वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती आणि त्याला उपचारासाठी इंग्लंडला परत पाठवण्यात आले होते.

तसेच भारतीय दौऱ्यावर येण्यापूर्वी घरगुती काम करत असताना देखील त्याला दुखापत झाली होती.ज्यामुळे इसीबीच्या मेडिकल टीमने त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तो आयपीएलमधील पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर आहे.

आयपीएल २०२१ साठी राजस्थान रॉयल्स संघ

संजू सॅमसन (कर्णधार),जोस बटलर, बेन स्टोक्स, यशस्वी जयसवाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयंक मारकंडे, जोफ्रा आर्चर, लियाम लिविंगस्टोन, कुलदीप यादव,आकाश सिंग, एंड्रयू टाय, जयदेव उनाडकत, कार्तिक त्यागी, क्रिस मॉरिस, शिवम दुबे, मुस्ताफिजुर रहमान, चेतन साकारिया, केसी करियप्पा

महत्त्वाच्या बातम्या –

पाकिस्तानविरुद्धची वनडे मालिका अर्ध्यात सोडून ‘या’ संघाचे शिलेदार निघाले आयपीएल वारीला

सलग ४ हंगामात प्लेऑफ गाठलेल्या आयपीएलच्या ‘या’ संघाला का म्हटले जाते कंजूस आणि लूटेर्‍यांची टीम? वाचा कारण

IPL 2021: ‘रनमशिन’ कोहलीची नजर खास विश्वविक्रमावर, आजपर्यंत कोणालाच नाही जमला नाहीये ‘तो’ पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---