इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मंगळवारी त्याने या शेवटचा आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला. डरहॅम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याला कोणतीही मोठी खेळी करता न आल्याने चाहते भावूक आणि नाराज झाले होते. स्टोक्सच्या या निर्णयावर अनेक क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी दु:ख व्यक्त केले. दरम्यान, इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमनेही या प्रकरणानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
२०१९ विश्वचषकात इंग्लंडला विजेता बनवणाऱ्या खेळाडूंत सर्वात पुढे असलेल्या स्टोक्सने सोमवारी वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणे त्याच्यासाठी अशक्य असल्याचे त्याने म्हटले होते. जेव्हा मॅक्युलमला याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने वेगळीच प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘मी त्याच्या निर्णयावर खूश आहे.’
स्टोक्सचा हा निर्णय जगातील इतर खेळाडूंसाठी ट्रेंड होईल का? असा प्रश्न मॅक्युलमला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, ‘सर्व प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी आहे. त्याने असा निर्णय घेतला नसता, पण व्यस्त वेळापत्रकाचा विचार करता ती काळाची गरजही होती. त्याने कसोटी कर्णधारपदाची भूमिका सर्वोच्च स्थानी ठेवली. जगभरात हा ट्रेंड होईल की नाही माहीत नाही. पण खरे सांगायचे तर मी याकडे पूर्णपणे सकारात्मकतेने पाहतो. मी आता स्टोक्ससोबत अधिक वेळ घालवण्यास उत्सुक आहे.”
मे महिन्यात ब्रेंडन मॅक्युलम याला इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले होते. त्याचवेळी जो रूटने संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर स्टोक्स कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने चार कसोटी सामने खेळले असून, या सर्व सामन्यात इंग्लंडला विजय मिळाला आहे. स्टोक्स-मॅक्युलम जोडीच्या या आक्रमक क्रिकेटला बॅझबॉल क्रिकेट असे देखील म्हटले जाते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘शार्दुल ठाकुरकडे हार्दिक पंड्याएवढी क्षमता नाहीये…’, माजी दिग्गजाची प्रतिक्रिया चर्चेत
किती हे क्रिकेट? टी२० विश्वचषकाआधी टीम इंडिया खेळणार दोन नव्या मालिका; असा आहे कार्यक्रम
धवन-गिलची झक्कास कामगिरी! दोघांनीही मागे सोडला ‘विक्रमादित्य सचिन’