ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज बेन मॅकडरमाॅट आणि वेस्ट इंडीजचा अष्टपैलू रोमॅरियो शेफर्ड यांनी मागील काही दिवसांत चमकदार कामगिरी केली आहे. या दोघांना आत्तापर्यंत कधी आयपीएल लिलावात घेण्यात आलेले नाही, पण यावर्षी पहिल्यांदा इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा करार मिळण्याची शक्यता आहे. या दोन दिग्गज खेळाडूंवर मागील आयपीएल हंगामात कोणत्याच फ्रॅंचायझीने बोली लावली नव्हती.
पण, २७ वर्षीय बेन मॅकडरमाॅट याने बिग बॅश लीगमध्ये चालू हंगामात उत्तम कामगिरी केली असल्यामुळे त्याला स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते. पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया टी२० संघात त्याला स्थान मिळाले आहे. बेन मॅकडरमाॅटने बिग बॅश लीगच्या यंदाच्या हंगामात १५३.८६ च्या सरासरीने सर्वात जास्त ५७७ धावांची शानदार खेळी खेळली आहे. हा खेळाडू १७ आंतरराष्ट्रीय टी२० आणि २ एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत.
मॅकडरमॉटने क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूला सांगितले की, “आयपीएलच्या लिलावात बोली लावण्यामध्ये मी फारसे काही करू शकत नाही, हे त्या लोकांवर अवलंबून आहे, जे त्याचे प्रभारी आहेत.” तो म्हणाला, “मी उत्साहित आहे. हा नेहमीच रोमांचक काळ असतो. मला आठवते की गेल्या वर्षी रिले मेरेडिथसाठी मोठी बोली लागली होती. त्यावेळी न्यूझीलंडमध्ये क्वारंटाईन असताना आम्ही त्याला हॉटेलच्या खोल्यांमधून पाहत होतो.”
गतवर्षी, रिले मेरेडीथ आणि झाय रिचर्डसन या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांच्या जोडीने बीग बॅश लीगच्या यशस्वी हंगामानंतर पंजाब किंग्ससोबत मोठ्या रकमेचा करार केला होता.
अधिक वाचा – अखेर लखनऊ फ्रेंचायझींचे झाले नामकरण! ‘या’ नावाने उतरणार आयपीएलमध्ये
त्याव्यतिरिक्त रोमॅरियो शेफर्डने टी२० मध्ये २० डावात २१ चौकार आणि २१ षटकार मारले होते. तसेच त्याने ३६ डावात ४९ गडी बाद केले आहेत. शेफर्डने रविवारी इंग्लंडविरुद्ध २८ चेंडूत ४४ धावांची नाबाद खेळी केली. या २७ वर्षीय अष्टपैलूने या डावात ५ षटकार तर १ चौकार लगावला होता. तसेच गोलंदाजी करताना एक विकेट घेतली.
शेफर्डने क्रिकइन्फोशी बोलताना म्हणले आहे की, माझ्या हातात आत्ता जे आहे मी त्याच्यावरच लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. शेफर्ड लिलावासाठी ७५ लाख मुळ किंमत असलेल्या खेळाडूंच्या यादीत आहेत. तो म्हणाला, जर एखादा आयपीएस हंगाम मिळाला तर ते माझ्यासाठी चांगलेच असेल. मी असे म्हणत नाही की मी याबद्दल विचार करत नाही. मी याबद्दल विचार करतो, पण सामन्याच्यावेळी याविषयी न विचार करण्याचा प्रयत्न करतो. मी फक्त खेळावर लक्ष केंद्रित करतो.
व्हिडिओ पाहा – पुजाराला त्याचे वडिल एका गोष्टीपासून कायम वाचवत होते
रोमॅरियो शेफर्डने वेस्टइंडीजच्या त्या ४१ खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांनी आयपीएल लिलावासाठी नोंदणी केली आहे. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावासाठी १२१४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यात ३१८ परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. १२ आणि १३ फेब्रुवारीला मोठा लिलाव आयोजित केला जाणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये ८ नाहीतर १० संघ खेळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये ‘या’ ५ फलंदाजांवर लागू शकते कोटींची बोली, १० संघांमध्ये रंगणार रंजक लढत
शेन वॉर्नची मोठी भविष्यवाणी!! अश्विनसह ‘हा’ गोलंदाज मोडू शकतो मुथय्या मुरलीधरनचा ८०० विकेट्स विक्रम
भारतीय संघाने अश्विनला बाहेर करून ‘या’ गोलंदाजाला स्थान दिले पाहिजे, दिग्गजाने सुचवला पर्याय