---Advertisement---

Video: ‘पुष्पा’ फिवर! मानेपर्यंत रुळणारे केस मोकळे सोडत राहूल चाहरचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर भन्नाट डान्स

On: बुधवार, जानेवारी 26, 2022 3:10 PM
Rahul Chahar
---Advertisement---

‘पुष्पा’ या सुपरहीट चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावरची रिल्स प्रचंड व्हायरल होत आहेत. या रिल्सवर अनेक दिग्गज कलाकार, खेळाडू नाचताना दिसत आहेत. यातचं सोशल मिडीयावर सतत सक्रिय असणाऱ्या भारतीय क्रिकेटर राहुल चाहरच्या व्हिडीओने देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

राहुलनेसुद्धा त्याच्या इंस्टाग्राम आकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो केस मोकळे सोडून नाचताना दिसत आहे. तसेच त्याने काळा चष्मा लावला असून श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसत आहे.

गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील डायलॉग्सचे आणि गाण्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. राहुल चाहरने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने ‘अल्लू अर्जुनचा चाहता’ असे कॅप्शन दिले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/CZCpFETj3GF/

२२ वर्षीय फिरकी गोलंदाज राहुल चाहरच्या या व्हिडीओला ७८ हजारांहून अधिक लोकांनी लाइक्स केले आहे. तसेच ६०० हुन अधिक प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. गोलंदाज खलील अहमदने यावर प्रतिक्रीया देत म्हटले आहे की, ‘खुप छान राहुल.’ तसेच त्याने हसणारा इमोजीही शेअर केला आहे. तसेच अल्लू अर्जुननेही कमेंट करत म्हणले आहे की, ‘सर्व प्रेमासाठी खुप धन्यवाद’. तसेच अनेक चाहत्यांनी हसायचे ईमोजी टाकत कमेंट केल्या आहेत.

अलीकडेच राहूलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. राहुलने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने १ एकदिवसीय आणि ६ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ आणि टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत. राहुलने १८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण ७० बळी घेतले आहेत. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना गतवर्षी नामिबियाविरुद्ध दुबई येथे खेळला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल लिलावात ‘या’ दोन परदेशी खेळाडूंवर असेल सर्वांचीच नजर; एक आहे बीबीएलचा सर्वोत्तम खेळाडू

आयपीएलमध्ये ‘या’ ५ फलंदाजांवर लागू शकते कोटींची बोली, १० संघांमध्ये रंगणार रंजक लढत

शेन वॉर्नची मोठी भविष्यवाणी!! अश्विनसह ‘हा’ गोलंदाज मोडू शकतो मुथय्या मुरलीधरनचा ८०० विकेट्स विक्रम

व्हिडिओ पाहा – पुजाराला त्याचे वडिल एका गोष्टीपासून कायम वाचवत होते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---