मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 8 बाद 258 धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी अजून 141 धावांची तर भारताला विजयासाठी 2 विकेट्सची गरज आहे.
मात्र या सामन्यात उद्या पाचव्या दिवशी(30 डिसेंबर) पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजही(29 डिसेंबर) काहिवेळासाठी खेळपट्टीवर कव्हर टाकण्यात आले होते.
उद्या सकाळच्या सत्रातच सर्वाधिक 32 टक्के पावसाची शक्यता आहे. त्यानंतर ही पावसाच्या शक्यतेची टक्केवारी कमी आहे. साधारण ऑस्ट्रेलियातील प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजल्यानंतर ही टक्केवारी 13 अशी आहे.
या सामन्यात भारताने दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषित करत पहिल्या डावातील 292 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने नाबाद 61 धावांची खेळी केली आहे. चौथ्या दिवसाखेर त्याच्याबरोबर नॅथन लायन नाबाद 6 धावांवर फलंदाजी करत होता.
या डावात चौथ्या दिवसाखेर भारताकडून रविंद्र जडेजाने तीन तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन आणि इशांत शर्माने एक विकेट घेतली आहे.
अशी आहे उद्या मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता (ऑस्ट्रेलिया प्रमाणवेळेनुसार) –
सकाळी 11.00 वाजता – 32%
दुपारी 01.00 वाजता – 23%
दुपारी 03.00 वाजता – 13%
दुपारी 04.00 वाजता – 13%
संध्या. 05.00 वाजता – 13%
महत्त्वाच्या बातम्या:
–शेपूट वळवळलं! टीम इंडियाच सेलीब्रेशन १६ तासांनी लांबलं
–हा आहे यावर्षीचा रिषभ पंतचा सर्वोत्तम झेल, पहा व्हिडिओ
–जेव्हा तूला कॅंटीन सुरु कराव लागले तेव्हा मयांक काॅफी प्यायला येईल- शास्त्री