भारतासाठी कुस्तीतून आनंदाची बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने कझाखस्तानच्या सनायव नूरिस्लामला पराभूत करत अंतिम फेरीचे तिकीट खिशात घातले आहे. तसेच ऑलिंपिकचे रौप्य पदक पक्के केले आहे. यासह रवीने इतिहास रचला आहे. तो अंतिम सामन्यात पोहोचणारा दुसरा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.
रवी पहिल्या राऊंडमध्ये २-१ ने आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या राऊंडमध्ये तो नूरिस्लामने एकापाठोपाठ एक असे चार वेळा २ गुण मिळवत आघाडी ९-२ अशी केली. यानंतर रवीसाठी पुनरागमन करणे कठीण होते. रवी हिंमत न हरता ५ गुण घेत ७-९ असे केले. त्यानंतर रवीने प्रतिस्पर्ध्याला थेट चितपट करत अंतिम फेरीत धकड मारली. (Medal assured as wrestler Ravi Dahiya storms into finals)
https://twitter.com/WeAreTeamIndia/status/1422852299609706496
सुशील कुमारनंतर अंतिम सामन्यात पोहोचणारा दुसरा भारतीय कुस्तीपटू
विशेष म्हणजे भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारनंतर अंतिम सामन्यात पोहोचणारा रवी कुमार दहिया हा दुसराच भारतीय कुस्तीपटू आहे. सुशीलने लंडन ऑलिंपिक्स २०१२ मध्ये अंतिम सामन्यात पोहोचत रौप्य पदक जिंकले होते. आता रवीलाही कमीत कमी रौप्य पदक मिळणे निश्चित झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारतीय कुस्तीपटूंचा नादच खुळा! रवी दहियानंतर दीपक पुनियाचाही सेमीफायनलमध्ये प्रवेश
-क्या बात है! नायझेरियाच्या एजीओमोरला भारतीय पठ्ठ्याने चारली धूळ; आता भिडणार चीनच्या कुस्तीपटूशी






