---Advertisement---

राहुल-सचिनच्या नावातून पडले नाव, मुंबईकर असूनही बनला न्यूझीलंडचा हुकुमी एक्का; वाचा रचिन रवींद्रबद्दल

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 10:39 PM
---Advertisement---

भारतीय वंशाच्या खेळाडूंनी न्यूझीलंडकडून खेळणे सामान्य बाब आहे. ईश सोधी, जीतन पटेल, जीत रावल आदींनी न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या यादीत आणखी एक नाव रचिन रवींद्रचेही सामील झाले आहे. या युवा क्रिकेटपटूची आणि त्याच्या नावाची सध्या खूप चर्चा आहे. कोण आहे रचिन रवींद्र जाणून घेऊया.

रचिन रवींद्र या युवा क्रिकेटपटूने भारताविरुद्ध कानपूर कसोटीत पदार्पण केले आहे. जयपूर टी-२० साठी न्यूझीलंड संघातही त्याचा समावेश करण्यात आला होता. जयपूरमध्ये मात्र रचिनला खेळपट्टीवर जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही आणि तो मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. त्याने ८ चेंडूत फक्त ७ धावा केल्या होत्या.

विशेष म्हणजे या खेळाडूचे नाव राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या दोन महान भारतीय खेळाडूंच्या नावावर ठेवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या नावामधून ‘रा’ आणि सचिनच्या नावामधून ‘चिन’ असे त्याचे नाव ‘रचिन’ ठेवण्यात आले आहे.

रचिनचा जन्म वेलिंग्टन येथे मूळ भारतीय असलेले रवी कृष्णमूर्ती आणि दीपा कृष्णमूर्ती यांच्या पोटी झाला. रवी कृष्णमूर्ती हे सॉफ्टवेअर सिस्टम आर्किटेक्ट आहेत. रचिनचे वडील रवी १९९० च्या दशकात बेंगलोरहून न्यूझीलंडला गेले. ते हट हॉक्स क्लबचे संस्थापक आहेत. खरं तर रवी यांनाही क्रिकेटची आवड आहे आणि ते बेंगलोरमध्ये खूप क्रिकेट खेळले आहेत.

https://twitter.com/BLACKCAPS/status/1463718588204732418?s=20

रचिनने २०१६ साली १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत तसेच २०१८ साली १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने न्यूझीलंड संघासाठी एकूण ६ टी-२० सामने खेळले आहेत. या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. लॉर्ड्सवर भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडच्या संघातही त्याची निवड झाली होती, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते.

रचिनने एका मुलाखतीत सांगितले होते की, गेल्या चार वर्षांपासून त्याने दरवर्षी हिवाळ्यात आरडीटी (अनंतपूर, आंध्र प्रदेश) येथे प्रशिक्षण घेतले आहे. महान सचिन तेंडुलकरला त्याने त्याचा आदर्श म्हटले होते. नोव्हेंबर २०१६ मध्ये रचिन म्हणाला होता, भारतीय क्रिकेटचा दिग्गज सचिन तेंडुलकरची फलंदाजीची शैली पाहून त्याने क्रिकेट शिकण्याचा प्रयत्न केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

धुआं-धुआं था वो समा… धुक्याने भरलेल्या कानपूर स्टेडियमला पाहून जाफरला सुचली मस्ती, शेअर केले मीम

Video: अर्धशतकवीर शुभमन गिलची कमजोरी झाली जगजाहीर! सतत एकाच प्रकारे होतोय बाद

मुंबई इंडियन्सचे सह-संघमालक यूएई टी२० लीगमध्ये खरेदी करणार आहेत संघ, तयारीही झालीय पूर्ण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---