-Sharad Bodage
क्रिकेट हा भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ. या खेळाच्या माध्यमातूनच सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांनी भारताचे नाव जागतिक पातळीवर उंचावले. पुरुष संघाप्रमाणेच महिला संघातील काही खेळाडूंनी देखील भारताचे नाव उज्ज्वल केले.
दरम्यान, भारतात अशी एक महिला होती, ज्यांनी एक क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र नशिबाने त्यांना राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळता आले नाही. पण आपल्यातला उत्साह कायम ठेवत आईच्या मार्गदर्शनाखाली त्या वाटचाल केल्या आणि इतिहास घडवला. सुनिता शर्मा असं त्यांचं नाव आहे. ज्या भारतातील पहिल्या महिला क्रिकेट प्रशिक्षक आहेत.
अधुरे स्वप्न
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांची निवड करण्यात आली होती. मात्र,अंतिम अकरामध्ये त्यांना स्थान मिळाले नाही. निराश न होता त्या क्रिकेट खेळत राहिल्या. पुढे नव्या दमाच्या युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा क्रिकेटपटू घडवले.
प्रशिक्षण घेण्यास दिला नकार
आपल्या आईच्या सांगण्यावरून सुनीता यांनी क्रिकेट कोचिंग प्रोग्रामचा कोर्सदेखील पूर्ण केला. 1976 साली पटियाला येथून नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये कोचिंग डिप्लोमा पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र नव्या दमाच्या खेळाडूंना पुरुष प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घ्यायला आवडत असे. त्यामुळे त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्यायला सहसा तयार होत नव्हते.
दीप दास गुप्ताने गिरवले धडे
भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दीप दास गुप्ता याने वयाच्या सातव्या वर्षी सुनीता यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. दीप दासगुप्ता यांचे आईवडील त्याला एका पुरुष प्रशिक्षकाकडे मार्गदर्शन द्यावे असा विचार करत होते. पण दीप दास गुप्ताने नकार देत सुनिता शर्मा यांच्या कडेच क्रिकेटचे मार्गदर्शन घेण्याचे ठरवले.
शतक ठोकल्यानंतर आल्या चर्चेत
एका महिला क्रिकेट प्रशिक्षकाकडे क्रिकेटचे धडे घेतलेल्या दीप दास गुप्ताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात शतक ठोकले. त्यानंतर सुनिता शर्मा यांचे नाव देशात चर्चेत आले. दीप दासगुप्ता असा खेळाडू आहे, ज्याचे प्रशिक्षक एक महिला क्रिकेटपटू होत्या.
महिलांसाठी भरवले प्रशिक्षण शिबीर
सुनिता शर्मा यांनी शशी गुप्ता, अंजू जैन, अंजुम चोपडा या खेळाडूंना मार्गदर्शन केले. 1975 ते1990 दरम्यान त्यांनी शांता रंगास्वामी, डायना एडुल्जी, संध्या अग्रवाल या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण शिबीर भरवले होते.
द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित
सुनिता शर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तयार केले. क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्यांना 2005 साली द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! टीम इंडियाला मोठा झटका, कर्णधार रोहित शर्मा कोरोनाच्या विळख्यात