भारताचा माजी यष्टीरक्षक आणि महान कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला भेटण्याची प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. केवळ भारतच नव्हे तर परदेशातील क्रिकेटपटूही त्याच्याकडून धडे घेण्यासाठी उस्तुक असतात. २०२१ साली संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकात (T20 World Cup 2021) धोनी भारतीय संघाचा मार्गदर्शक (Team India’s Mentor) होता.
यावेळी भारतीय संघाचा मार्गदर्शन करण्याबरोबर तो इतर देशांच्या खेळाडूंसोबत आपले अनुभव आणि ज्ञान वाटताना दिसला होता. यादरम्यान त्याची भेट पाकिस्तानच्या युवा गोलंदाज शाहनवाज दहानी (Shahnawaz Dahani) याच्यासोबत झाली होती. आता या भेटीबद्दल दहानीने प्रतिक्रिया दिली आहे.
धोनीला भेटून आपले आवडत्या भारतीय क्रिकेटपटूला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे दहानीने म्हटले आहे. याबद्दल क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना दहानी म्हणाला की, “मला तुम्हा सर्वांना धोनीच्या पातळीबद्दल समजावून सांगण्यासाठी खूप वेळ लागेल. त्याला भेटणे, एक मोठे स्वप्न पूर्ण होण्यासारखे होते. मी त्या क्षणाला कधीही विसरू शकणार नाही. त्याचे शब्द खूप फायदेशीर होते. कारण त्याने मला जिवनाबद्दल सांगितले. जीवन कसे जगायचे, मोठ्यांचा सन्मान करायचा, अशा गोष्टी त्याने मला सांगितल्या.”
“तसेच क्रिकेटमधील आव्हानांबद्दल बोलताना धोनी मला म्हणाला की, क्रिकेटमध्ये चांगले आणि वाईट दिवस येत राहतात. परंतु आपल्याला प्रत्येक परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. आव्हानांचा स्विकार करून त्याना पूर्ण केले पाहिजे. ज्या खेळावर आपण सर्वाधिक प्रेम करतो, त्या खेळाप्रती समर्पित राहिले पाहिजे,” असे दहानी पुढे म्हणाला.
हेही वाचा- केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर
जोफ्रा आर्चरला भेटण्याची आहे इच्छा
२३ वर्षीय दहानीने आतापर्यंत पाकिस्तानकडून २ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २ विकेट्सही घेतल्या आहेत. सध्या तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुल्तान सुल्तान्स संघाचे प्रतिनिधित्त्व करतो आहे. पाकिस्तानचा हा वेगवान गोलंदाज न्यूझीलंडच्या महान गोलंदाज शेन बॉन्ड यांना आपला आदर्श मानतो. परंतु सध्या त्याचे इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला भेटण्याचे स्वप्न आहे.
याबाबत बोलताना दहानी म्हणाला, “मी न्यूझीलंडच्या शेन बॉन्डचे अनुसरण करत होतो. मला त्यांच्यासारखाच वेगाने गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज बनायचे होते. परंतु त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मी इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचे अनुसरण करायला सुरुवात केली. माझी इच्छा आहे की, लवकरच माझी त्याच्याशी प्रत्यक्षात भेट व्हावी.”
महत्त्वाच्या बातम्या-
संपूर्ण यादी: प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात सर्वाधिक पाँइंट्स मिळवणारे टॉप ५ रेडर्स आणि डिफेंडर्स
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून ऋतुराज गायकवाड बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली टीम इंडियात संधी
एकट्याच्या जीवावर इंग्लंड नडणारा परंतू आता विस्मृतीत गेलेला वेणुगोपाल राव