वेलिंग्टन| शुक्रवार रोजी (२५ मार्च) ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात आयसीसी महिला वनडे विश्वचषकातील २५ वा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ४३ षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने ३२.१ षटकांमध्ये ५ विकेट्स बाकी असतानाच बांगलादेशचे आव्हान पूर्ण केले आणि बेसीन रिझर्व, वेलिंग्टन येथे झालेला हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला.
या सामना विजयात ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मेग लॅनिंग फार योगदान देऊ शकली नाही. उलट ती या सामन्यात खातेही न खोलता बाद झाली. यामुळे एक नकोसा विक्रम तिच्या खात्यात नोंदवला गेला आहे. (Meg Lanning becomes the first in Womens ODIs for Australia to record a Duck on their birthday)
या सामन्यात (AUSW vs BANW) पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना ५० षटकांऐवजी ४३ षटकांचा झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडल्याने बांगलादेशचा संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ४३ षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १३५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग ही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली होती.
Salma Khatun with a second for Bangladesh!
Meg Lanning is bowled for a duck at the Basin Reserve #CWC22 pic.twitter.com/EymD7azv40
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 25, 2022
८ चेंडूंचा सामना केल्यानंतर ती बांगलादेशची गोलंदाज सलमा खातून हिच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाली आणि शून्यावर पव्हेलियनला परतली. विशेष म्हणजे, शुक्रवारी अर्थात २५ मार्चला मेग लॅनिंगचा (Meg Lanning) ३० वा वाढदिवस (Meg Lanning Bithday) होता. त्यामुळे वाढदिवसादिवशी वनडे क्रिकेटमध्ये शून्यावर विकेट गमावणारी लॅनिंग पहिलीच ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
याबरोबरच योगायोग असा घडला आहे की, लॅनिंग वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व स्टेडियमवर वाढदिवसाला वनडेत शून्यावर बाद होणारी दुसरी महिला फलंदाज बनली आहे. तिच्यापूर्वी वृंदा भगत बेसिन रिझर्व मैदानावर जन्मदिनी शून्यावर बाद झाली होती.
महिला विश्वचषकात वाढदिवसाला शून्यावर बाद होणाऱ्या क्रिकेटपटू-
वृंदा भगत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९८२
लोपामुद्रा भट्टाचार्जी विरुद्ध इंग्लंड, १९८२
मेहर मिनवाला विरुद्ध डेन्मार्क, १९९७
मेग लॅनिंग विरुद्ध बांगलादेश, २०२२
दरम्यान हा ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक २०२२ मधील शेवटचा साखळी फेरी होता. हा सामनाही जिंकत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत उडी मारली आहे. तर बांगलादेशचा हा पाचवा पराभव होता.
महत्त्वाच्या बातम्या-
नव्वदवर ८ विकेट्स, संकटात असलेल्या इंग्लंडचे गोलंदाज सॉलिड खेळले; फलकावर २०० धावा लावूनच गेले
‘अपराजित’ ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक, बांंगलादेशला ५ विकेट्सने नमवत केला विजयी शेवट