बुधवारी(२७ ऑक्टोबर) टी-२० विश्वचषकात बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्स राखून विजय मिळवला. क्रिकेटच्या मैदानावर असे नेहमी पाहिले गेले आहे की, खेळाडू एखाद्या दुसऱ्या खेळाडूप्रमाणे शॉट खेळण्याचा प्रयत्न करतात. काहींना यामध्ये यश येते, तर काही तसा शॉट खेळू शकत नाहीत. श्रीलंकेचा माजी खेळाडू तिलकरत्ने दिलशान त्याच्या स्कूप शॉटसाठी ओळखला जातो. भारताचा कर्णधार विराट कोहली, इंग्लंडचा जेसन रॉय आणि माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीही हा शॉट मारू शकत होता. आता बुधवारी पार पडलेल्या सामन्यातही बांगलादेशच्या मेहदी हसननेही असाचा शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो या प्रयत्नात विकेट गमावून बसला.
या सामन्यात बांगलादेशाचा कर्णधार महमूदुल्लाहने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रथम फलंदाजी करताना त्यांचे फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत. बांगलादेश संघ त्यांच्या फलंदाजीवेळी निर्धारित २० षटकांमध्ये ९ विकेट्स गमावून १२४ धावा करू शकला.
मुश्फिकुर रहीमने बांगलादेशसाठी ३० चेंडूत सर्वाधिक २९ धावा केल्या. यामध्ये त्याच्या चार चौकारांचा समावेश होता. इंग्लंडच्या टायमन मिल्सने त्याच्या चार षटकांमध्ये २७ धावा दिल्या आणि ३ विकेट्सही घेतल्या. त्याव्यतिरिक्त क्रिस वोक्सने अवघ्या ३ च्या इकोनॉमीने चार षटकांमध्ये १२ धावा दिल्या आणि एक विकेटही घेतली.
मैहदी हसनने स्कूप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात टायमन मिल्सच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. मेहदी हसनने डावाच्या १८ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर स्कूप शॉट खेळून चेंडू सीमारेषेपार लागावण्याचा प्रयत्न केला, पण क्रिस वोक्सच्या हाताच झेल गेला आणि त्याने तो कोणतीही चूक न करता पकडला. त्याने या सामन्यात १० चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकरही मारले.
आता आयसीसीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून मेहदी हसनचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला एका तासामध्ये १० हजारपेक्षा पेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, मेहदी हसन मोठा शॉट खेळण्यासाठी खाली बसतो, पण मिल्सच्या टाकलेल्या संथ गतीच्या चेंडूमुळे मेहदीने मारलेला स्कूप शॉट लांब गेला नाही आणि तो बाद झाला. विकेट घेतल्यानंतर मिल्स खूप आनंदी दिसला.
https://www.instagram.com/reel/CVh85_Gl9uG
या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशने दिलेल्या १२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग २ विकेट्स गमावत १४.१ षटकात पूर्ण केला.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्यांनी पराभूत केले त्याच पाकिस्तानी गोलंदाजांचे केन विलियम्सनकडून तोंड भरून कौतुक; म्हणाला…
शोएब अख्तर म्हणतोय, ‘न्यूझीलंडला पराभूत करून आम्ही भारताला वाचवले, चांगले शेजारी असंच करतात’