बुधवारी (दि. 07 डिसेंबर) बांगलादेश विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेश पहिल्या वनडे विजयाचा आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरला होता. बांगलादेशच्या फलंदाजांनाही भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवली. या सामन्यात तळात फलंदाजी करणारा विस्फोटक फलंदाज मेहिदी हसन मिराज याने या सामन्यात शकत ठोकत एक खास विक्रम रचला.
झाले असे की, या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार लिटन दास (Litton Das) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना बांगलादेशकडून दोन फलंदाजांनी 50 हून अधिक धावा चोपल्या. त्यात तळात फलंदाजी करणाऱ्या एकाने पुढे शतकही साजरे केले. तो फलंदाज म्हणजेच मेहिदी हसन (Mehidy Hasan) होय. मेहिदीने या सामन्यात 83 चेंडूंचा सामना करताना नाबाद 100 धावा केल्या. या धावा करताना त्याने 4 षटकार आणि 8 चौकारांचीही बरसात केली.
WHAT. A. KNOCK 🔥
Mehidy Hasan Miraz brings up his maiden ODI century to help Bangladesh to a competitive total 💪#BANvIND | Scorecard 👉 https://t.co/A76VyZDXby pic.twitter.com/rYHU4n5iJr
— ICC (@ICC) December 7, 2022
हे शतक साजरे करताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो वनडेत आठव्या किंवा त्याखालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना संयुक्तरीत्या सर्वोच्च धावा करणारा खेळाडू बनला. त्याच्यापूर्वी आयर्लंडचा सिमी सिंग याने 2021मध्ये डब्लिन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करताना नाबाद शतक साजरे केले होते.
बांगलादेशचा डाव
बांगलादेश संघाने निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 271 धावा केल्या. या धावांमध्ये मेहिदी हसनचे शतक सोडले तर महमुदुल्ला याने 77 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 7 चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त नजमुल हुसेन शांतो (21), नसुम अहमद (18), मुशफिकुर रहमान (12), अनमुल हक (11) यांनी दोन आकडी धावसंख्या केली.
यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदर याने 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाची खराब सुरुवात
बांगलादेश संघाच्या 272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला विराट कोहली (Virat Kohli) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) उतरले होते. यावेळी विराटने चौकाराने डावाची सुरुवात केली. मात्र, त्याला ही कामगिरी पुढे कायम ठेवता आली नाही. विराट दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. भारताला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. (Mehidy Hasan Miraz record in 2nd odi ban vs ind)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उमरानचा बॉल गोळीसारखा आला अन् शाकिबचं हेल्मेट तोडून गेला, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण
पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा व्हिसा भारताकडून मंजूर, ब्लाईंड टी20 विश्वचषकात खेळण्याचा मार्ग मोकळा