इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाचा पहिला टप्पा पार पडला असून आता दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू झाले आहेत. अशात चेन्नई सुपर किंग्स संघाच्या बाबतीत शनिवारी (३० एप्रिल) मोठी बातमी समोर आली. अष्टपैलू रविंद्र जडेजा याने चेन्नईचे नेतृत्व सोडून पुन्हा एमएस धोनीकडे कर्णधारपद सोपवले आहे. यानंतर सोशल मीडियातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
धोनी पुन्हा कर्णधार
खंरतर धोनी (MS Dhoni) २००८ पासून चेन्नईचा कर्णधार (CSK Captain) होता. त्याने १२ वर्षे चेन्नईने नियमितपणे कर्णधारपद सांभाळले होते. पण त्याने २०२२ हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्णधारपद सोडले होते आणि रविंद्र जडेजाला चेन्नईचा नवा कर्णधार बनवण्यात आले होते. पण जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
चेन्नईने जडेजाच्या (Ravindra Jadeja) नेतृत्वात ८ सामन्यांत केवळ २ विजय मिळवले. एवढेच नाही, तर जडेजाची वैयक्तिक कामगिरीही फारशी बरी झाली नाही. त्याने ८ सामन्यात चेन्नईचे नेतृत्व करताना फलंदाजीत ११२ धावा केल्या. तसेच ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळेच जडेजाने त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी चेन्नईच्या कर्णधारपदाचा मुकूट उतरवला आणि पुन्हा धोनी कर्णधार बनला.
सोशल मीडियावर उमटतायेत प्रतिक्रिया
जडेजाने धोनीकडे पुन्हा चेन्नईचे कर्णधारपद सोपवल्यानंतर सोशल मीडियातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत. एका सोशल मीडिया युजरने एक मीम शेअर केले आहे, ज्यात लिहिले आहे की, ‘हे तर होणारच होते.’ तसेच दुसऱ्या एका युजरने ‘थाला इज बॅक’ असा एक फोटो शेअर केला आहे.
https://twitter.com/Akki2g/status/1520406138520731648
Welcome Back Captain @MSDhoni 💥#MSDhoni #IPL2022 #WhistlePodu pic.twitter.com/n6cGSHjmCe
— DHONI Trends™ (@TrendsDhoni) April 30, 2022
#IPL2022 MSD becomes the captain of CSK again.
Thala returns. pic.twitter.com/X2a3BIktyY— Anonymous9726 (@Anonymous97261) April 30, 2022
Jadeja hands over the captaincy to MS Dhoni
Le MS fans: pic.twitter.com/eIZLBdNc0D
— J 🍕 (@jaiimiinsays) April 30, 2022
MS Dhoni fans rn : pic.twitter.com/kSclHw8MaF
— Yash Singh (@Yashrjpt278) April 30, 2022
Breaking news;Ravindra Jadeja has handed over the CSK captaincy back to MS Dhoni.
🔥🔥 8️⃣ Returns To 7️⃣💛🥳😎 @msdhoni @ChennaiIPL @imjadeja pic.twitter.com/aHzTIEVVR0— Abhi Kancherla (@abhikancherla) April 30, 2022
Ravindra Jadeja has handed over CSK's captaincy back to MS Dhoni
CSK management to jadeja : pic.twitter.com/GdghhzmCjU
— Jαყαɳƚ Sԋαɾɱα 🚩 (@Jayant8815) May 1, 2022
This scene really happened 😂 #CSK𓃬 #Dhoni #IPL2022 pic.twitter.com/PdT27Dtcwp
— A.J. (@beingabhi2712) April 30, 2022
Dhoni to CSK!!!#Captain #captaincy pic.twitter.com/gBgTEb18Rl
— @iammp (@maheshspawar1) April 30, 2022
धोनीची कर्णधार म्हणून कामगिरी
धोनीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत सर्वाधिकवेळ कर्णधार म्हणून घालवला आहे. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या १४ आयपीएल हंगामातील १३ हंगामात नेतृत्त्व केले आहे. तसेच त्याच्याच नेतृत्त्वाखाली चेन्नईने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपदही जिंकले आहे. तसेच तब्बल ९ वेळा चेन्नई संघ त्याच्या नेतृत्त्वाखाली अंतिम सामना खेळला आहे.
धोनीने आयपीएल कारकिर्दीत खेळलेल्या २२० सामन्यांपैकी २०४ सामन्यांत नेतृत्त्व केले आहे. यातील १२१ सामन्यात विजय मिळवला आहे. त्याने ११६ सामने चेन्नईचे नेतृत्व करताना जिंकले आहेत, तर ५ सामने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व करताना जिंकले आहेत. धोनी आयपीएलमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांत विजय मिळवणारा पहिला कर्णधार आहे. इतकेच नाही, तर तो २०० पेक्षा अधिक आयपीएल सामन्यांत नेतृत्त्व करणारा देखील एकमेव कर्णधार आहे. इतकेच नाही, तर धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने (CSK) दोन वेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धाही जिंकली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL | ‘हे’ ३ खेळाडू चालवणार धोनीची जागा? बनू शकतात चेन्नईचे भविष्यातील कर्णधार
झेलबाद झाला गिल, परंतु डीआरएसमध्ये निघाला नो बॉल; नाट्यमय प्रसंगामुळे पंचांवर चिडला विराट
नऊ पैकी ८ सामने जिंकूनही गुजरात टायटन्ससाठी दूर आहे प्लेऑफ, जाणून घ्या गणित