मुंबई। ब्रेबॉर्न स्टेडियमवर शुक्रवारी (६ मे) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ५१ वा सामना पार पडला. हा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेरच्या चेंडूवर ५ धावांनी विजय मिळवला. अखेरच्या षटकात गुजरातला ९ धावा करण्यात अपयश आले. मुंबई इंडियन्सचा हा आयपीएल २०२२ हंगामातील दुसरा विजय होता. त्यांच्या या विजयानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
मुंबईचा अटीतटीच्या सामन्यात विजय
शुक्रवारी झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकली आणि मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७७ धावा केल्या. मुंबईकडून इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी सलामीला ७४ धावांची भागीदारी करत मुंबईला चांगली सुरुवात मिळवून दिली. पण हे दोघेही अर्धशतक करण्यापासून थोडक्यात मुकले.
इशानने मुंबईकडून सर्वाधिक ४५ धावा केल्या. तसेच रोहितने (Rohit Sharma) ४३ धावांची खेळी केली. त्यांच्यानंतर टीम डेव्हिडने आक्रमक खेळ करत २१ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४४ धावा ठोकल्या. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी गुजरातला दमदार सुरुवात दिली होती. त्यांनी अर्धशतकी खेळी केल्या. साहाने ५५ आणि गिलने ५२ धावा केल्या. या दोघांनी सलामीला १०६ धावांची सलामी भागीदारी देखील रचली (GT vs MI).
पण, गिल आणि साहा हे दोघे बाद झाल्यानंतर गुजरातच्या अन्य फलंदाजांना खास कामगिरी करता आला नाही, त्यामुळे गुजरातला २० षटकात ५ बाद १७२ धावा करता आल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना जिंकला. मुंबईकडून मुरूगन अश्विनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. अखेरच्या षटकात मुंबईकडून डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) गोलंदाजी करताना ९ धावांचे यशस्वी रक्षण केले. त्याने या षटकात केवळ ३ धावाच दिल्या.
मुंबईचे सलग २ विजय
मुंबईसाठी (Mumbai Indians) आयपीएल २०२२ हंगाम (IPL 2022) खास राहिलेला नाही. त्यांनी या हंगामात आत्तापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांपैकी ८ सामन्यांत पराभव पत्करले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी हे ८ पराभव सलग पहिल्या ८ सामन्यात पत्करले आहेत. त्यामुळे आयपीएल हंगामात पहिले सलग ८ सामने पराभूत होणारा मुंबई इंडियन्स पहिलाच संघ देखील आहे. पण, या ८ पराभवांनंतर मुंबईने चांगले पुनरागमन केले असून त्यांनी त्यांच्या ९ व्या आणि १० व्या सामन्यात विजय मिळवले आहे. मात्र, ८ पराभवांमुळे मुंबईचे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आव्हान संपुष्टात आले आहे.
सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
मुंबई इंडियन्सच्या आयपीएल २०२२ मधील दुसऱ्या विजयानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. तसेच अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत. अनेकांनी अखेरच्या षटकात ९ धावांचे रक्षण करणाऱ्या डॅनिएल सॅम्सचे कौतुक केले आहे, तर सध्या आयपीएल २०२२ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्सला पराभवाचा धक्का दिल्याबद्दल मुंबई इंडियन्सवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
एका सोशल मीडिया युजरने एक मीम शेअर केले आहे, ज्यावर लिहिले आहे, ‘ये तुला फिनिशिंग कशी असते ते दाखवतो.’, तर दुसऱ्या एका युजरने ‘जेव्हा वेळ येईल तेव्हा, सर्वात मोठी उडी आम्ही मारू’ अशा अर्थाचे वाक्य लिहिलेले मीम शेअर केले आहे. तसेच एका युजरने मराठी चित्रपट मुळशी पॅटर्नमधील एका सीनचा व्हिडिओ शेअर करत गुजरात टायटन्सची मजा घेतली आहे.
https://twitter.com/trumptatya64/status/1522784093187964928
"Mumbai Indians are out this season"
But they have Tim David, Brevis, Tilak Verma, Jofra, Stubbs full time next season: pic.twitter.com/51mseuVTNZ
— Hemant (@SportsCuppa) May 6, 2022
Tim David to Mahela #GTvMI pic.twitter.com/nRQBHB0vE7
— ComeOn Cricket 🏏🇮🇳 (@ComeOnCricket) May 6, 2022
This is how MI won the game 😄 #GTvMI #IPL2022 pic.twitter.com/Cxrs4OyBKM
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 6, 2022
1. MI in 39 overs of the match
2. MI in the last over today pic.twitter.com/rfN7IMsHCk— Sagar (@sagarcasm) May 6, 2022
https://twitter.com/_dhruvirat718_/status/1522635449277116416
Daniel Sams Our Hero😭😭👑#MIvsGT #MumbaiIndians pic.twitter.com/AMqFyz4LBO
— Priyesh (@_priyeshh) May 6, 2022
Hardik and team after losing!!😭😭#GTvsMI #MumbaiIndians pic.twitter.com/iJEjDvU75R
— Priyesh (@_priyeshh) May 6, 2022
https://twitter.com/Rohitian45a/status/1522640593448366080
Never Ever Mess With Rohit Sharma 😎 #MIvGT pic.twitter.com/kX1F7vVvgf
— Ritika Malhotra 🇮🇳 (@FanGirlRohit45) May 6, 2022
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना ९ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL | अटीतटीच्या लढतीत मुंबईच सर्वांना वरचढ! ‘इतक्यांदा’ मिळवला ५ पेक्षा कमी धावांनी विजय
‘नशीब कधी ना कधी बदलणार होतेच’, मुंबईच्या दुसऱ्या विजयानंतर कर्णधार रोहित खुश
भारतीय संघ इंग्लंडनंतर जाणार वेस्ट इंडिज दौऱ्यावर, पाहा कसे असेल वेळापत्रक