---Advertisement---

‘आता पुढच्यावर्षी कप नमदे’, १५ व्या वर्षीही IPL जिंकण्याचे स्वप्न भंगलेल्या बेंगलोरची उडतेय खिल्ली, Memes Viral

On: शनिवार, मे 28, 2022 12:29 PM
RCB-Memes
---Advertisement---

अहमदाबाद। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला राजस्थान रॉयल्सने ७ विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे राजस्थानने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता तब्बल १४ वर्षांनी राजस्थान आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसणार आहे. यापूर्वी २००८ मध्ये राजस्थानने अंतिम सामना खेळताना तो जिंकला होता. दरम्यान, शुक्रवारच्या सामन्यानंतर मीम्स व्हायरल होत आहेत. 

बेंगलोरचे स्वप्न पुन्हा भंगले
बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आयपीएलमधील अशा संघांपैकी एक संघ आहे, जो पहिल्या आयपीएल हंगामापासून खेळत आहे, पण त्यांना अद्याप आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश आलेले नाही. त्यांनी तीन अंतिम सामने देखील खेळले आहेत, पण प्रत्येकवेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

तसेच गेले तीन वर्षे ते सलग प्लेऑफमध्ये (IPL Playoffs) पोहचले आहेत, मात्र त्यांना अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्यात अपयश आले आहे. त्यांना २०२० आणि २०२१ वर्षी एलिमिनेटर सामन्यात पराभव पत्करावा लागला होता, तर आता एलिमिनेटर जिंकून त्यांना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे फाफ डू प्लेसिस या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली यंदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची त्यांना आशा होती. मात्र, त्यांना यावर्षीही अंतिम सामना गाठता आला नाही.

त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या कामगिरीवरून मीम्स व्हायरल (Memes Viral) होत आहेत. तसेच बेंगलोर संघाकडून गेली १५ वर्षे खेळत असलेला विराट कोहलीही (Virat Kohli) ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

https://twitter.com/durga_putri/status/1530244017216139265

https://twitter.com/indurikarbhakt/status/1530242630885396480

https://twitter.com/Shivansh_here_/status/1447591368365273088

https://twitter.com/lifeisunfair007/status/1530244672760651776

राजस्थानचा १४ वर्षांनी अंतिम सामन्यात प्रवेश 
दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात (Qualifier 2) राजस्थानने नाणेफेक जिंकून बेंगलोरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बेंगलोरने २० षटकांत ८ बाद १५७ धावा केल्या. बेंगलोरकडून रजत पाटीदारने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली.

तसेच कर्णधार फाफ डू प्लेसिसने २५ आणि ग्लेन मॅक्सवेलने २४ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. विराट कोहलीही ७ धावा करून बाद झाला. राजस्थानकडून ओबेड मॅकॉय आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या (Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals).

यानंतर १५८ धावांचा पाठलाग करताना राजस्थानकडून एकट्या जोश बटलरने (Jos Buttler) नाबाद १०६ धावांची खेळी केली. त्याला यशस्वी जयस्वालने २१ आणि संजू सॅमसनने २३ धावा करत चांगली साथ दिली. त्यामुळे १८.१ षटकात राजस्थानने १६१ धावा करत सामना आपल्या नावावर केला आणि अंतिम सामन्यात धडक मारली. बेंगलोरकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

जल्लोष तर होणारच! १४ वर्षांनी आयपीएल फायनलला पोहचलेल्या राजस्थानचे ‘रॉयल’ सेलिब्रेशन

IPL प्लेऑफमध्ये वॉर्नरला पछाडत बटलरने दाखवला ‘जोश’! पाटीदारचाही विक्रमाच्या यादीत समावेश

बटलर मारण्यात अन् सिराज-हसरंगा षटकार खाण्यात आघाडीवर; RCBच्या गोलंदाजांचा नकोसा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---